90 सेकंदासाठी थांबला जगाचा विनाश! डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले, पण 12 वाजले की...

Doomsday Clock : अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले आहेत. यामुळे 90 सेकंदासाठी  जगाचा विनाश थांबला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 24, 2024, 06:16 PM IST
 90 सेकंदासाठी थांबला जगाचा विनाश! डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले, पण 12 वाजले की...  title=

Doomsday Clock 2024: 90 सेकंदासाठी जगाचा विनाश थांबला आहे. अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले आहेत. यापूर्वी 2023 मध्ये हे घड्याळ रिसेट करण्यात आले होते. पण, या डूम्स डे क्लॉकमध्ये 12 वाजले की जगाचा विनाश अटळ आहे. डूम्स डे क्लॉकमधील वेळेचा आणि पृथ्वीच्या विनाशाचा काय संबंध आहे जाणून घेवूया.  

अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकचे काटे 90 सेकंदांनी पुढे सरकवण्यात आले आहेत.  2024 या वर्षात डूम्स डे क्लॉक पुन्हा रिसेट करण्यात आले आहे.  2023 मध्येच पृथ्वीचा विनाश होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली होती. अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकच्या इशाऱ्यानंतर संशोधकांनी पृथ्वीचं फिरणं बंद होऊन प्रलय येईल अशी देखील भिती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, 2023 मध्ये  पृथ्वीचा विनाश टळला आहे. कारण, हे क्लॉक रिसेट करण्यात आले होते. 

25 वेळा रीसेट करण्यात आलेय 'डूम्स डे क्लॉक'  

डूम्सडे क्लॉकसाठी धोक्याची पातळी अनेक स्केलवर मोजली जाते. युद्ध, शस्त्रे, हवामान बदल, विध्वंसक तंत्रज्ञान, प्रचार व्हिडिओ आणि अंतराळात शस्त्रे तैनात करण्याच्या प्रयत्नांसारख्या जागतिक हालचालींद्वारे त्याचे मूल्यांकन मोजले जाते. या घडाळ्याच्या निर्मीतीपासून ते 25 वेळा रीसेट करण्यात आले आहे. जानेवारी 2023 मध्ये हे घड्याळ 90 सेकंद पुढे सरकवण्यात आले होते. आता 23 जानेवारी 2024 जानेवारी रोजी हे डूम्स डे क्लॉक पुन्हा रिसेट करण्यात आले. या घड्याळ्याचे काटे पुन्हा90 सेकंदासाठी पुढे सरकवण्यात आले आहेत.   

'डूम्स डे क्लॉक' नेमकं आहे तरी काय? 

'डूम्स डे क्लॉक'  हे एक सांकेतिक घड्याळ आहे. जगात घडणा-या चांगल्या-वाईट घटनांनुसार त्यातली वेळ बदलते असा संशोधकांचा दावा आहे. या घडाळ्यात मध्यरात्रीचे 12 वाजले तर संपूर्ण मानवजातीचेच 12 वाजतील, विनाश होईल असा दावा केला जातो. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये हे घड्याळ आहे.1945 मध्ये हिरोशिमा-नागासकी विध्वंसानंतर या घड्याळाची निर्मिती करण्यात आली. या घडाळ्यात रात्रीचे 12 वाजले तर जगाचा विनाश होईल असं मानलं जातं.  मध्यरात्री 12 वाजण्याच्या जितकं जवळ हे घड्याळ जाईल तितका अंत जवळ आला असं मानलं जातं.  जगात घडणा-या विध्वंसक घटनांमुळे या घड्याळाचा काटा पुढे सरकतो.1991 मध्ये रात्रीचे 12 वाजायला फक्त 17 मिनिटं बाकी होती. 2023 मध्ये 12 वाजण्यासाठी फक्त 90 सेकंद बाकी होती. 

डूम्स डे क्लॉकने दिला होता पृथ्वीचा अंत जवळ आल्याचा इशारा 

2023 मध्ये या घडाळ्यात 12 वाजण्यासाठी फक्त 90 सेकंद बाकी होती. यामुळेच 2023 मध्ये जगाचा विनाश अटळ आहे अशी भविष्यवणी करण्यात आली होती. 2023 मध्येच जगाचा अंत होईल अशी भिती वैज्ञानिकांनी वर्तवली होती. अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकच्या इशा-यानुसार पृथ्वीचा अंत जवळ आल्याचा दावा संशोधकांनी केला होता. कदाचित पृथ्वी फिरायची थांबून प्रलय येईल किंवा परमाणु युद्धात जगाचा विनाश होईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिला होता. डूम्स डे क्लॉकने दाखवलेल्या वेळेनुसार संशोधकांनी हा इशारा दिला होता. या क्लॉकमध्ये मध्यरात्रीचे 12 वाजायला फक्त 90 सेकंद बाकी असताना संशोधकांनी पृथ्वीच्या विनाशाचा इशार दिला होता. यामुळे जगभरातल्या वैज्ञानिकांमध्ये दहशत पसरली होती.