मुंबई : Melania हे नाव, हा चेहरा सारं जग ओळखतं. त्यांचं नाव सर्वांना लक्षातही राहतं. कारण हा चेहरा आहे अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' मेलानिया ट्रम्प यांचा. मेलानिया ट्रम्प यांच्या सौंदर्याचे अनेक जण दिवाने आहेत. मेलानिया आणि ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास २४ वर्षांचं अंतर आहे. मेलानिया ट्रम्प यांची तिसरी पत्नी असून जगातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या जोड्यांमध्ये मेलानिया आणि ट्रम्प या जोडीचाही समावेश आहे.
मेलानिया यांचा जन्म १९७० मध्ये यूगोस्वावियामध्ये झाला. त्यांनी स्लोवानियामध्ये वयाच्या १६व्या वर्षीच मॉडेलिंग सुरू केलं होतं. १८ व्या वर्षी इटलीच्या कंपनीसाठी त्यांना मॉडलिंग असायनमेंट मिळालं होतं.
१९९८मध्ये मेलानिया ट्रम्प यांना भेटल्या. त्यावेळी त्या मॉडेलिंगसाठी अमेरिकेत आल्या होत्या. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर मेलानिया आणि ट्रम्प यांनी २००४मध्ये लग्न केलं. मेलानिया यांनी २००६मध्ये एका मुलाला जन्म दिला. बॅरन असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. २००६मध्ये मेलानिया अमेरिकेच्या नागरिक झाल्या.
मेलानिया ट्रम्प यांच्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो अमेरिकेच्या एका दैनिकानं छापला होता. १९९० मधील हे फोटो होते ज्यावेळी मेलानिया मॉडलिंग करत होत्या तेव्हाचे. न्यूयॉर्क पोस्टनंही पहिल्या पानावर हे फोटो छापले होते. त्याखाली हे फोटो फ्रान्सच्या एका मॅगझिनसाठी घेतल्याचं लिहिलं होतं. तेव्हा मेलानिया यांच्या नावाची बरीच चर्चाही झाली.
निवडणुकीदरम्यान ज्यावेळी donald trump डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते त्यावेळी मेलानिया ट्रम्प यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे भावी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देशाची भावी फर्स्ट लेडी म्हणून समोर आणण्यात आलं. टाळ्यांच्या कडकडाटात मेलानिया ट्रम्प यांनी त्यावेळी आपलं भाषण सुरू केलं आणि पती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भावूक आवाहन केलं. ट्रम्प अमेरिकेच्या नागरिकांना कधीही निराश करणार नाही असं त्यांनी आपल्या भाषणात त्यावेळी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा सुधारण्यासाठी मेलानिया यांनी आपल्या भाषणात सर्वोतोपरी प्रयत्न केले. या भाषणामुळे जनतेला मिशेल ओबामा यांच्या भाषणाची आठवण झाली.
वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत
जागतिक स्तरावर शक्तिशाली देश म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरात जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा त्यांना पावलोपावली साथ देणाऱ्या या फर्स्ट लेडीची म्हणजेच मेलानिया ट्रम्प यांचीही होते.