भारत-चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी भारत आणि चीनमध्ये संयुक्त सचिव-स्तरीय चर्चा होण्याची शक्यता आहे आहे. 

Updated: Jun 24, 2020, 09:04 AM IST
भारत-चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक title=

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी भारत आणि चीनमध्ये संयुक्त सचिव-स्तरीय चर्चा होण्याची शक्यता आहे आहे. त्यामुळे या चर्चेत अंतिम तोडगा निघणार काय, याची उत्सुकता आहे. दरम्यान, पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापले सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत ही सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

२०१२ मध्ये भारत-चीन सीमाभागात शांतता  राखण्यासाठी सल्लामसलत आणि समन्वय साधण्यासाठी तसेच त्यांच्या सीमा सुरक्षा कर्मचार्‍यांमधील संवाद आणि सहकार्य बळकट करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी डब्ल्यूएमसीसीची स्थापना २०१२ मध्ये संस्थात्मक यंत्रणा म्हणून केली गेली. भारत-चीन सीमा वादावर चर्चा करण्यावार भर देण्यात येणार आहे. आज बुधवारी दोन्ही देशांमधील सीमा तणावावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेणार!

पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापले सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोल्डो येथे काल दोन्ही देशांमधे  झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असे भारताने म्हटले आहे. पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष क्षेत्रांतून आपापले सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांत ११ तासांच्या प्रदीर्घ चर्चेत मतैक्य झाले. सोमवारी उशिरापर्यंत वरिष्ठ कमांडर्सची ही बैठक झाली. मात्र ही सैन्य माघार टप्प्याटप्प्याने किती कालावधीत घ्यावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

 दरम्यान, दोन्ही देशांत गेल्या काही आठवडयांच्या संघर्षांनंतर काही प्रमाणात सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा झाली. त्यात पूर्व लडाखमधील भागातून सैन्य माघारीचे ठरवण्यात आले आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व १४व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, चीनच्या बाजूने तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे मेजर जनरल लिउ लिन यांनी चर्चेचे नेतृत्व केले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या हिंसक झडपेत भारतीचे २० जवान शहीद झाले होते. भारताने ही चीनची पूर्वनियोजित कृती असल्याचे स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात पूर्व लडाखमधील संघर्षग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याबाबत आणखी बोलणी सुरु राहणार आहेत. आज सीमावादावर चर्चा होणार आहे. लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची पहिली फेरी सहा जूनला झाली होती त्यात गलवान खोऱ्यातून सैन्य माघारीस मान्यता देण्यात आली होती, पण नंतर १५ जूनला गलवानमध्ये चिनी सैन्याने हिंसाचार केला. त्यानंतर चर्चेत बाधा आली होती.