Afghanistan | तालिबानसमोर अफगाणिस्तानची शरणागती, राष्ट्रपती अशरफ गनींचा राजीनामा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी (asharaf ghani resigned)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Aug 15, 2021, 06:03 PM IST
Afghanistan | तालिबानसमोर अफगाणिस्तानची शरणागती, राष्ट्रपती अशरफ गनींचा राजीनामा title=

काबूल : अफगाणिस्तानात रविवारी भीषण युद्ध झालं. तालिबानी हल्ल्यांचा सामना करताना राजधानी काबूल पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्पती अशरफ घनी (Asharaf ghani)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं समजत आहे. याशिवाय, राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्सही पोहोचली आहेत. (asharaf ghani resigned ali ahamd jalil to be appointed as new interim head)

अफगाणिस्तानी माध्यमांनुसार, अली अहमद जलाली (Ali Ahamd Jalil) यांना अशरफ घनी यांच्या जागी अंतरिम सरकारचे नवे प्रमुख बनवण्यात आलं आहे. जलाली जर्मनीमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत राहिले आहेत. याआधी असंही म्हटलं जात होतं की तालिबानी काबुलजवळ पोहचले आहेत. काबुलजवळ येताच तालिबान्यांनी निवेदन जारी केलं. त्यानुसार त्यांना कोणताही दंगा न करता शांततेच्या मार्गाने राजधानी काबूलचा ताबा हवा असल्याचं म्हटलंय. त्यासाठी सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही त्यानी म्हटलंय.
 
राष्ट्रपती भवनात चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तान उच्च परिषदेच्या राष्ट्रीय सलोख्याचे प्रमुख अब्दुल्ला दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करत आहेत.