स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ

स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर प्रवेश कसा करतात याचा व्हिडीओ एका अंतराळवीराने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ही प्रक्रिया नेमकी कशी असते. 

वनिता कांबळे | Updated: Jan 24, 2024, 07:43 PM IST
 स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ  title=

International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही अंतराळातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले  अंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करतात. पृथ्वीवरुन एका विशिष्ट यानातून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. मात्र, या  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका अंतराळवीराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहे.

अंतराळवीराने शेअर केला व्हिडिओ

क्रिस हैडफील्‍ड (Chris Hadfield) नावाच्या अंतराळवीराने स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा व्हिडीओ शेअर केला आहे. X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडिओ 1.92 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ रिशेअर केला आहे. तर, या व्हिडीओवर अनेक कमेंट्स देखील येत आहेत. 

कशी असते डॉकिंग आणि बर्थिंग प्रोसेस

पृथ्वीवरुन अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर नेणारे यान आणि स्पेस स्टेशन हे एकमेकांना कशा प्रकारे कनेक्ट होतात याचा हा व्हिडीओ आहे. यानतून  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत डॉकिंग आणि बर्थिंग प्रोसेस म्हणतात. डॉकिंगमध्ये, एक अंतराळयान स्पेस स्टेशन जोडले जाते. हे कनेक्शन तात्पुरते  असते. यान स्पेस स्टेशनला कनेक्ट झाल्यानंतर पॉडच्या माध्यमातून अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश करतात.   

International Space Station मध्ये 5 डॉकिंग पोर्ट तयार करण्यात आले आहेत. हे पोर्ट अत्याधुनिक आयडीएस ट्रान्समीटरने सुसज्ज आहेत. स्पेस स्टेशनवर रशियाचा डॉकिंग पॉइंट अमेरिकेपेक्षा वेगळा आहे. रशियन डॉकिंग पॉइंट SSBP-G4000 म्हणून ओळखला जातो. सध्या सोयुझ आणि प्रोग्रेस सारख्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून अंतराळवीरांना येथे पाठवले जाते. स्पेस स्टेशनला अगदी सहज कनेक्ट होईल अशी या  स्पेसक्राफ्टची रचना आहे. 

अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो

अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे.  20 नोव्हेबर 1998 पासून  International Space Station ची उभारणी करण्यात आली. एक एक भाग अंतराळात नेऊन अंतराळात या स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली. विशेष प्रकारचे ट्रेनिंग घेतल्यानंतर अंतरावीर या स्पेस स्टेशनवर रिसर्च करण्यासाठी जातात. अनेक देशांचे अंतराळवीर येथे कार्यरत आहेत. काही महिन्यांसाठी अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. यानंतर पुन्हा हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतातय  International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती फिरत आहे. दरम्यान या स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो.