पुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्...; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं

Baba Vanga Predictions For 2024 : दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये बाबा वेंगांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांनी 2024 संदर्भात 7 धक्कादायक भाकितं केली आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 02:37 PM IST
पुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्...; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं title=
2024 संदर्भात व्यक्त केलं भयाण भाकित

Baba Vanga Predictions For 2024 : 'बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे. 86 वर्षीय बाबा वेंगा याचं खरं तर 1996 सालीच निधन झालं आहे. मात्र त्यांनी सन 5079 पर्यंतचे भविष्य सांगून ठेवल्याचा दावा केला जातो. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेले अनेक दावे खरे ठरले आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणीपैकी 85 टक्के भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर झालेल्या 9/11 चा दहशतवादी हल्ला, 'ब्रेक्झिट'बरोबरच जगात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल अचूक भाष्य केलं होतं.

अवघ्या काही दिवसांवर 2024 सन आलेलं असताना आता बाबा वेंगांनी या सनासाठी काय भविष्यवाणी केली आहे त्याची चर्चा आहे. पुढील वर्षामध्ये 7 मोठ्या घटना घडणार असल्याचं बाबा वेगांची भविष्यवाणी सांगते. या सात गोष्टी कोणत्या ते सविस्तरपणे पाहूयात...

व्लादिमीर पुतिन यांची हत्या:

वेंगा यांनी केलेल्या भाकीतानुसार 2024 मध्ये एक रशियन नागरिक रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या करण्याची दाट शक्यता आहे.

युरोपमधील दहशतवाद:

2024 सालामध्ये युरोपमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ होऊ शकते.जैविक शस्त्रांच्या चाचण्या किंवा प्रत्यक्ष वापर करुन एखाद्या मोठ्या देशाकडून हल्ले होण्याची शक्यता आहे, बाबा वेंगांनी व्यक्त केला आहे. 

हवामानसंदर्भातील आपत्ती:

2024 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार आहे. सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचं वर्ष म्हणून या वर्षाची आठवण केली जाऊ शकते अशी भीतीही वेंगा यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रामुख्याने हवामान बदलामुळे घडलेल्या गंभीर घटना आणि किरणोत्सर्गाच्या वाढलेल्या पातळी यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

आर्थिक संकट:

वाढत्या कर्जामुळे, जागतिक स्तरावर आर्थिक तणावाची तीव्रता वाढेल. पाश्चात्य राष्ट्रांकडून पूर्वेकडील लोकांकडे सत्तेची केंद्रस्थान हळत असल्याने 2024 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. एका महत्त्वपूर्ण भू-राजकीय संक्रमणाच्या माध्यमातून आर्थिक संकटाची भविष्यवाणी वेंगा यांनी केली आहे.

सायबर हल्ले:

2024 मध्ये पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट सुविधांसारख्या गंभीर पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होऊ शकतात. कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या या सुविधांना लक्ष्य करणाऱ्या सायबर हल्ल्यांची प्रकरणे आणखीन वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सायबर हल्ल्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असं वेंगा यांचा अंदाज आहे.

तांत्रिक क्रांती:

वेंगा यांनी क्वांटम कंप्युटिंगमध्ये उल्लेखनीय प्रगती 2024 मध्ये होईल असं म्हटलं आहे. तसेच या वर्षामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात वाढेल असंही वेंगा यांनी म्हटलं आहे.

वैद्यकीय प्रगती:

कर्करोग आणि अल्झायमरसारख्या दुर्धर आजारांवर मात करण्यासंदर्भातील मौलाचा शोध यंदाच्या वर्षी लागू शकतो. या दोन्ही आजारांना समूळ नष्ट करण्यासंदर्भातील मोठं यश 2024 मध्ये मिळू शकतं, वेंगा यांनी भाकीत केलं आहे.

2024 साठीच्या भविष्याबरोबरच वेंगा यांनी 2076 मध्ये समाजवादाची ताकद पुन्हा वाढेल असं म्हटलं आहे. तसेच 2304 पर्यंत टाइम ट्रॅव्हल करण्यात मानवाला यश मिळेल असंही सांगण्यात आलं आहे. सन 5079 मध्ये पृथ्वी नष्ट होईल असं वेंगा यांनी म्हटलं आहे.