भल्यामोठ्या उंदराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 सफाई कर्मचाऱ्यांना एक भलामोठा उंदीर आढळला.

Updated: Sep 25, 2020, 12:52 PM IST
भल्यामोठ्या उंदराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल title=
फोटो सौजन्य : फेसबुक

नवी दिल्ली : प्रत्येक गल्ली, शहरात उंदीर अतिशय सामान्यपणे आढणारा प्राणी आहे. अनेक जण आपल्या घरात पांढऱ्या रंगाचे उंदीरही पाळतात. गोदामं, रेल्वे स्टेशन, जंगलात अशा ठिकाणी आढळणारे उंदीर साधारणपणे लहान-मोठ्या आकाराचे असतात. पण कधी अवाढव्य, महाकाय उंदीर असल्याचं ऐकलंय का? असाच एक अवाढव्य, विशाल उंदीर मॅक्सिको शहरात आढळला आहे.

मेक्सिको शहरात (Mexico City) नालेसफाईचं काम सुरु असताना, यादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना एक भलामोठा उंदीर आढळला आहे.

सोशल मीडियावर अशाप्रकारचे विचित्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे या उंदराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना आधी हा उंदीर आहे असं वाटलं होतं, पण नंतर पाहिल्यानंतर तो नकली असल्याचं लक्षात आलं. तो एक हॅलोविन प्रॉप (Halloween Prop) होता. हॅलोविन पार्टीनंतर त्याला नाल्यात टाकण्यात आलं होतं. हा उंदीर इतक्या मोठ्या आकाराचा होता की, आसपासचे लोक आश्चर्यचकित होऊन उंदराकडे पाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लोक या प्रॉपला फेकणाऱ्यावर टीका करत आहेत. मात्र एवलिन लोपेज या महिलेने याची जबाबदारी घेत सांगितलं की, काही वर्षांपूर्वी हॅलोविन सजावटीसाठी हा उंदीर बनवण्यात आला होता. त्यानंतर मुसळधार पावसात तो हरवला होता. त्या महिलेने उंदराचं स्कल्पचर शोधण्यासाठी मदतही मागितली होती. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नव्हती. पण सोशल मीडियावर या भल्यामोठ्या उंदराची मोठी चर्चा आहे.