वधूने लग्नात नेसली ३.५ किलोमीटरची साडी

 या लग्नात फुलं वाटण्यासाठी १०० शाळकरी मुलांचा देखील वापर करण्यात आला.

Updated: Sep 25, 2017, 12:33 AM IST
वधूने लग्नात नेसली ३.५ किलोमीटरची साडी  title=

कोलंबो : श्रीलंकेत एका वधूने लग्नात ३.५ किलोमीटरची साडी नेसली, मात्र ही साडी सांभाळण्यासाठी त्यांनी २५० शाळकरी मुलांना बोलावणं पाठवलं आणि या मुलांनी या वधूची साडी सांभाळली. 

काही तरी वेगळं करण्यासाठी या वधूने ३.५ किलो मीटरची साडी नेसली. हे जोडपं रस्त्याने पुढे चालत होत आणि ही मुलं वधूची साडी मागे सांभाळत होते. या लग्नात फुलं वाटण्यासाठी १०० शाळकरी मुलांचा देखील वापर करण्यात आला.

मात्र या साडीचं प्रकरण आता वाढण्याची शक्यता आहे कारण, राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकारांतर्गत या घटनेत संबंधित जोडप्याला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

शाळेच्या वेळेदरम्यान शालेय मुलांना अशापद्धतीने काम करायला सांगणे कायद्याने गुन्हा असल्याचे या अधिकारात म्हटले आहे. यात दोषींना १० वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.

या मुलांना श्रीलंकेतील २ मोठ्या शाळांमधून बोलविण्यात आले होते. यातील एक शाळा येथील मुख्यमंत्र्यांचीच आहे.