लंडन : ब्रिटेनचे आरोग्यमंत्र्याचा किसिंग फोटो वायरल झाल्याने मोठा विवाद झाला. कोविड नियमांचं आरोग्यमंत्र्यानेच उल्लंघन केल्याने लोकांनी त्यांच्याविरोधात मोहिम सुरू केली. त्यांचा परिणाम म्हणून आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी शनिवारी राजीनामा दिला. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. हॅनकॉक यांनी याप्रकरणी माफी देखील मागितली आहे. तरी हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये.
काही दिवसांपूर्वी खुलासा झाला होता की, हॅनकॉक यांनी आपल्या एका सहाय्यक महिलेशी संबधादरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे खुद्द आरोग्यमंत्रीच पालन करीत नसल्याने त्याच्यांवर प्रचंड टीकेचा भडीमार झाला.
I have resigned as Health Secretary pic.twitter.com/eyWi1AA19i
— Matt Hancock (@MattHancock) June 26, 2021
हॅनकॉक यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून याबाबत माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहले आहे की, 'मी समजू शकतो की, कोरोनामुळे देशाने खूप काही गमावलं आहे. आमच्यासारखे जे लोक नियम बनवतात त्यांनी त्याचे पालन करायला हवे. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे '