VIDEO: पत्नीसह भारतीय रेस्टॉरंटमध्ये पोहोचले Prince William; अचानक ग्राहकाचा फोन आला अन्...

Prince William and Kate Middleton Indian Restaurant Video: ब्रिटिश राजघरण्यातील प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन (Kate Middleton) यांनी नुकतीच एका भारतीय रेस्टोरंटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेली गंमत ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुम्ही हा (Viral Video) व्हिडीओ पाहिलात का? 

Updated: Apr 23, 2023, 05:26 PM IST
 VIDEO: पत्नीसह भारतीय रेस्टॉरंटमध्ये पोहोचले Prince William; अचानक ग्राहकाचा फोन आला अन्...  title=

Prince William and Kate Middleton Indian Restaurant Video: इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीची चर्चा ही अनेकदा सोशल मीडियावरून होताना दिसते. प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट (Prince William and Kate Middleton Video) हे अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट होत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे. यामध्ये ते एका भारतीय रेस्टोरंटला भेट देताना दिसतात. यावेळी ग्राहकांची ऑर्डरही ते घेताना दिसत आहेत. यावेळी नक्की ते कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि त्या रेस्टोरंटला भेट देताना ते नक्की ग्राहकांची ऑर्डर (Prince William Receives Customer Phone call) घेत आहेत? असा प्रश्न नेटकऱ्यांनाही पडला आहे.

सध्या त्यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर चर्चेचा ठरला आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की काय गंमत झाली ही कळेल. केट आणि विल्यम या दोघांनी बर्किंहम येथील एका भारतीय रेस्टोरंटला भेट दिली होती. तिथे गेल्यावर त्यांनी ग्राहकांसोबत एक प्रॅंक (जोक) केला ज्यामुळे सगळ्यांनाच हसू फूटले. हा व्हिडीओ शूट (Viral Video) करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. आणि यावर नेटकऱ्यांच्याही भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. (british royals price william and kate middleton funny moments goes viral on twitter in an indian restaurant in birmingham)

विल्यम आणि केट हे अनेकदा जगाच्या अनेक भागात दौऱ्यावर जात असतात. तेथील लोकांना ते भेटतात आणि त्यांच्यासोबत काही वेळ घालवतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ते एका भारतीय रेस्टोरंटमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना भेट देताना ते तिथल्या लोकांशी गप्पा मारत होते. त्या गप्पा सुरू असताना अचानक एका ग्राहकाचा फोन आला. साहजिकच हा फोन ग्राहकांनं काहीतरी ऑर्डर करण्यासाठी केला होता. यामध्ये या ग्राहकाला दोन लोकांसाठी टेबल बुक करायचं होतं. परंतु हा फोन प्रिन्स विलियम यांनी घेतला आणि ते चक्क फोनवरून त्याच्याशी बोलू लागले. 

या रेस्टोरंटच्या चालक एक भारतीय माहिला आहेत ज्याचे नावं मीना शर्मा आहे. ज्या आपल्या पतीसोबत हे रेस्टोरंट चालवतात ज्याचे नाव स्ट्रीटरी रेस्टोरंट (Streatery Restaurant) असे आहे. येथे भारतीय डिशेच मिळतात. समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा विल्यम यांनी हा फोन उचलला तेव्हा भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय अग्रवाल यांनी हा फोन केला होता. या व्हिडीओखाली अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.