Relationships: आईने पोटच्या मुलीलाच दिला धोका, तिच्याच बॉयफ्रेंडला गटवलं आणि झाली...

आईने आपल्याला मुलीला 'ती' गोड बातमी दिली, जी ऐकून मुलीचा पारा चढला... सोशल मीडियावर सांगितला आपबितीचा किस्सा

Updated: Dec 17, 2022, 10:56 PM IST
Relationships: आईने पोटच्या मुलीलाच दिला धोका, तिच्याच बॉयफ्रेंडला गटवलं आणि झाली...  title=

Mother Extra Marital Affairs : आई-मुलीचं (Mother-Daughter) नातं म्हणजे पवित्र नातं समजलं जातं, आई ही आपल्या मुलीची पहिली मैत्रिण असते. पण आईनेच आपल्या पोटच्या मुलीची फसवणूक केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. या मुलीने आपल्याबरोबर झालेल्या फसवणूकीचा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात झाला असल्याचं या मुलीने म्हटलं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
अमेरिकेत (America) राहणारी वेनेसा (Vanessa) नावाची मुलगी सुट्टीत फिरण्यासाठी मेक्सिकोला (Mexico) गेली होती. यादरम्यान वेनेसाचा बॉयफ्रेंड आणि तिची आई हे दोघंच घरी होते. वेनेसाने मेक्सिकोवरुन आईची विचारपूस करण्यासाठी फोन केला, पण आईने फोनवर सांगितलेली गोष्ट ऐकून वेनेसाच्या पायाखालची जमीनच सरकली.

आईने दिली प्रेग्नेंट असल्याची माहिती
आईने वेनेसाला आपण प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं. ही बातमी ऐकून वेनेसा सुरुवातील खुश झाली, आपण दीदी होणार या गोष्टीने वेनेसा आनंदीत झाली. पण तिचा हा आनंद काही क्षणच टीकला. पुढे आईने जे सांगितलं ते ऐकून वेनेसा सून्न झाली. ज्या मुलाला आपण जन्म देणार आहोत, तो मुलगा तिच्या बॉयफ्रेंडपासून असल्याचं तिच्या आईने वेनेसाला सांगितलं. ही गोष्ट ऐकून वेनेसाने तात्काळ आपली सुट्टी रद्द केली आणि ती पुन्हा अमेरिकेत आपल्या घरी परतली. यानंतर वेनेसाने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर किस्सा व्हायरल
वेनेसाने आपल्याबरोबर घडलेल्या भयानक घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. लोकांनी तिच्या आईला आणि बॉयफ्रेंडला चांगलंच सुनावलं. आपल्याच मुलीला धोका देणं कितपत योग्य असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर वेनेसाने आई आणि तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचं नातं कायमचं संपवलं.