Beed Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दर दिवशी नवी बातमी समोर येत असून, राज्यभरात राजकीय चर्चांनाही पेव फुटला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडही पोलिसांना शरण गेल्यामुळं त्याच्याभोवतालीही असंख्य घडामोडींना वेग आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. बीडमधील प्रत्येक घडामोडीवर सध्या तपासयंत्रणांपासून सर्वांचच लक्ष असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? हा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला असतानाच तिथं वडेट्टीवार यांनी एक योगायोग समोर आणला.
'वाल्मिक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल!' असं त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं आणि बीडमधील या प्रकरणातील तपासावर कैक प्रश्न उपस्थित केले. सरकारला वाल्मिक कराडवर निष्पक्ष कारवाई करायची असल्यास बीड जिल्ह्याबाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे असं आव्हान त्यांनी यंत्रणांना दिलं. संतोष देशमुख प्रकरणी मकोका अंतर्गत किंवा हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल न झाल्यामुळं या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्हं उपस्थित राहत असल्याचं म्हणज वडेट्टीवारांनी x च्या माध्यमातून पोस्ट करत संताप व्यक्त केला.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत. सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे. तसेच एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे. या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे.