Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी

Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.   

Updated: Jan 2, 2025, 11:47 AM IST
Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी  title=
beed news exclusive out of 5 1 bed is missing at beed police station santosh deshmukh walmik karad latest update

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड: (Beed Santosh Deshmukh Murder caseबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास सुरू असतानाच बीड पोलीस स्थानकात आणल्या गेलेल्या पाच पलंगांनी या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. वाल्मिक कराडवर यंत्रणांची कारवाई सुरू असतानाच पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणले गेले आणि आता मात्र त्यातील एक पलंग कमी झाल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

बीड पोलीस स्थानकात पाच पलंग आणण्यात आले होते. पण, त्यातील एक पलंग आता कमी झाला आहे. हा पलंग नेमका कुठे गेला हा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे. बीडमधील या घटनेला अनुसरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडिया पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या पलंग मागवले जाण्याच्या घटनेवर संशय व्यक्त केला होता.

बीड पोलीस स्थानकात बुधवारी पाच पलंग आणण्यात आले होते. पण, गुरुवारी मात्र इथं चारच पलंग दिसून आले. त्यामुळं पाचवा पलंग नेमका कुठं गेला हेच गुढ उकलण्यासाठी आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

हेसुद्धा वाचा : Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तपास यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगत आता कारवाईला वेग दिला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना केली आहेत.

घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार असून, एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचीही माहिती असल्यानं तो पुन्हा नेपाळला जाऊ शकतो का, या संदर्भातील संशय असल्यामुळं फरार असणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून आता पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.