नाशिक हादरले! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार

Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 2, 2025, 11:03 AM IST
नाशिक हादरले! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार  title=
Nashik Crime News girl raped twice in different places 5 people arrested

Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. निफाड पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचेदेखील समोर आले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात येत आहे. पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे दोघांनी विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आला.

निफाड पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे गुन्हा केला वर्ग केला होता. आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहेत. आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे. 

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी आणी साक्षी गवळी यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपी विशाल गवळी याला घेऊन कल्याण पोलिस शेगावलादेखील रवाना झाले होते. आरोपीने हत्या केल्यानंतर नेमका कुठे राहिला होता, कोण मदत करत होता, त्या ठिकाणचा पंचनामा व इतर पुरावे गोळा करण्यासाठी नेल्याची माहीती समोर येत आहे. आज आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे.