चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग

चीनच्या आंतराळवीरांनी भन्नाट प्रयोग केला आहे. चीनच्या स्पेस स्टेशनवर भाजीपाला पिकवण्यात आला आहे. 

Updated: Oct 30, 2023, 11:38 PM IST
चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग  title=

China Grows Vegetables In Space: चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन आहे. ‘तियांगॉन्ग’ असे या स्पेस स्टेशनचे (Tiangong space station China) नाव आहे. याच स्पेस स्टेशनवर चीनी आंतराळवीरांनी स्पेस गार्डन तयार केले आहे. येथे अनेक प्रकारचा भाजीपाला पिकवण्यात आला आहे. या स्पेस गार्डनचे व्हिडिओ सोशल मिडियावर सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

स्पेस स्टेशनवर दोन स्पेस गार्डन

चीनची 155 दिवसांची शेन्झो-16 मोहीम अंतराळात सुरू आहे. या स्पेस स्टेशनवर दोन स्पेस गार्डन तयार करण्यात आले आहेत. या स्पेस गार्डनमध्ये आंतराळवीरांनी शेती पिकवण्याचा प्रयोग केला आहे. हिरवा कांदा आणि चेरी टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे चीनच्या आंतराळवीरांनी स्पेस स्टेशन प्रयोगातील महत्वाचा टप्पा पार केला आहे.  जिंग हायपेंग, झू यांगझू आणि गुई हायचाओ यांच्या टीमने आकाशात भाजीपाला पिकवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. गुई हाईचाओ हे चीनच्या प्रतिष्ठित वैमानिक संस्थेतील बिहांग विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अंतराळात जाणारे ते पहिले चीनी नागरिक आहेत. 

असा पिकवला भाजीपाला

एका विशिष्ट उपकरणांच्या मदतीने अंतराळात भाजापीला पिकवण्याच्या प्रयोग करण्यात आला. हे उपकरण म्हणजे ओपन-स्ट्रक्चर्ड डिव्हाइस आहे. एका खास चेंबरमध्ये  तापमान, आर्द्रता, ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडची पातळी राखून अंतराळात वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करुन भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अंतराळात कोणत्या प्रकारचे तापमान नाही. अशा स्थितीत येथे भाजीपाला लागवडीचा यशस्वी प्रयोग हा अंतराळ संशोधनातील मोठ यश मानले जात आहे.  

चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी पेटवली होती मेणबत्ती

चीनच्या शेनझोऊ 16 अंतराळवीरांनी तियांगॉन्ग  स्पेस स्टेशनमध्ये मेणबत्ती पेटवली होती.  एका प्रयोगाचा भाग म्हणून ही मेणबत्ती पेटवण्यात आली होती. या प्रयोगाचे लाईव्ह टेलिकास्ट देखील करण्यात आले होते. 21 सप्टेंबर रोजी चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवरून थेट प्रक्षेपण करताना अंतराळवीर गुई हाईचाओ आणि झू यांगझोऊ एक मेणबत्ती पेटवली. तियांगॉन्ग स्पेसशनवरुन ऑनलाईन लेक्चर घेतले जाते. याला 'तियांगॉन्ग क्लासरूम' असे म्हंटले जाते. यावेळी एक प्रयोग दाखवताना ही मेणबत्ती पेटवण्यात आली होती. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि उघड्या ज्वालांबाबत कडक नियम असताना चीनने हा प्रयोग केला होता.