चीनमध्ये "टॉयलेट क्रांती" पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी खास प्रयत्न

चीनमध्ये पर्यटन क्रांती, पर्यटन वाढवण्यासाठी सजवले जात आहेत शौचालय 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 08:49 PM IST
चीनमध्ये "टॉयलेट क्रांती" पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी खास प्रयत्न  title=

मुंबई : चीनमध्ये पर्यटन क्रांती, पर्यटन वाढवण्यासाठी सजवले जात आहेत शौचालय 

क्रांतीचं नाव घेताच समोर येते ती युद्ध भूमी. मात्र ही क्रांती विनाशाची नाही तर ही आहे विकासाची. विकासाच्या गाथांमध्ये देखील क्रांतीचं योगदान आहे. भारतातील हरित क्रांती, सफेद क्रांती आणि निळी क्रांतीने धान्य, दूध आणि मच्छी उत्पादनात मोठं योगदान दिलं आहे. मात्र आम्ही एका अशा क्रांतीची चर्चा करत आहोत जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ही क्रांती आहे 'टॉयलेट क्रांती'. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून टॉयलेट क्रांतीला सुरूवात झाली आहे. 

toilet revolution

toilet revolution

toilet revolution

या वर्षाच्या शेवटापर्यंत चीनमध्ये ७० हजारहून अधिक शौचालय अपग्रेड करण्याचा विचार केला जात आहे. २०१८ ते २०२० या सालापर्यंत ६४ हजार शौचालयाची निर्मिती किंवा सुधारणा करण्याचा शब्द दिला आहे. यासाटी २० अरब युआन खर्च करणार असल्याचे सांगितले. या टॉयलेटला आधुनिक सुविधांची जोड असणार आहे. 

toilet revolution

toilet revolution

toilet revolution

उत्तर पश्चिम चीनच्या निन्ग्क्सिया हुईमद्ये गेल्यावर्षी २ वर्षांत पर्यटन स्थळांवर असलेल्या ४८१ सार्वजनिक शौचालयांवर जवळपास ४.५४ करोड अमेरिकन डॉलर खर्च केले असून त्याला विश्वस्तरीय केले आहे. इथे इतके सुंदर टॉयलेट्स तयार केले आहेत की ते पर्यटकांना आकर्षित करतात.