चीनकडून COVID-19वर उपाय? संक्रमित रुग्णांना ९९.९ टक्के बरं करण्याचा दावा

कोरोना व्हायरस ही महामारी मोठ्या संख्येने जगभरात पसरली आहे.

Updated: Mar 30, 2020, 08:38 AM IST
चीनकडून COVID-19वर उपाय? संक्रमित रुग्णांना ९९.९ टक्के बरं करण्याचा दावा title=

बीजिंग : कोरोना व्हायरस ही महामारी मोठ्या संख्येने जगभरात पसरली आहे. अत्यंत उत्तम आरोग्य सेवा पुरवणारे राष्ट्र देखील COVID-19 या धोकादायक विषाणू समोर हतबल झाले आहेत. त्यामुळे आता चिनी वैज्ञानिक या महामारीला लढा देण्यासाठी एक शस्त्र विकसित केले आहे का? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेला लॉकडाऊक चीनमध्ये मागे घेण्यात आला आहे. 

चिनी वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी एक नॅनोमटेरियलची निर्मीती केल्याचा दावा चीन मधील ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आला आहे.  रिपोर्टनुसार वैज्ञनिकांच्या एका टीमने COVID-19 या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी एक औषध निर्माण केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनकडून विकसीत करण्यात आलेला उपाय कोरोना रुग्णांसाठी खरंच लाभदायक आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चीनकडून विकसीत करण्यात आलेला हा नॅनोमटेरियल COVID-19 ९६.५ ते ९९.५ टक्के नष्ट करू शकतो. दरम्यान चीनकडून तयार करण्यात आलेला हा उपाय जर का गुणकारक ठरला तर COVID-19 संपूर्ण जगातून पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.