लाहोर : Corona: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Epidemic) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यात काही देश पुन्हा येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट होत गेली आहे. पाकिस्तानमधील प्रमुख सात शहरांत उद्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पंजाबमधील (Pakistani Punjab) सात शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेला केवळ सूट असणार आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन येथील पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने आपत्कालीन सेवा वगळता कोणालाही घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुलतान, गुजरानवाला आणि गुजरातमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही शहरे बंद राहणार आहेत.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या (Pakistani Punjab) सरकारने शनिवारी निवेदन जारी केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या हा लॉकडाऊन (Lockdown) दोन आठवड्यांचालावण्यात आला आहे. त्यानंतर, परिस्थितीचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. सरकारच्या निवेदनानुसार लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी असेल. सार्वजनिक, खासगी किंवा कोणत्याही ठिकाणी सामाजिक, धार्मिक किंवा इतर हेतूंसाठी सर्व प्रकारच्या मेळाव्यावर संपूर्ण बंदी असेल. बँक्वेट हॉल, कम्युनिटी हॉल आणि मार्केटही या काळात बंद राहतील.
लॉकडाऊन दरम्यान, हॉटेल्स बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीला परवानगी आहे. या काळात होम डिलिव्हरीला परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब सरकारने लाहोरसह तीन शहरांतील 36 भागात स्मार्ट लॉकडाउन लागू केले आहे.