पाकिस्तानचा रिपोर्टर ''चाँद नवाब''ने आणखी काय ''चार चाँद'' लावलेत... व्हीडिओ व्हायरल

आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Mar 16, 2021, 10:35 AM IST
 पाकिस्तानचा रिपोर्टर ''चाँद नवाब''ने आणखी काय ''चार चाँद'' लावलेत... व्हीडिओ व्हायरल title=

मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan)  'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijan) सिनेमातून चर्चेत आलेला पाकिस्तानचा रिपोर्टर चांद नवाब (Pakistan Reporter Chan Nawab New Video Goes viral on Social Media)   पुन्हा एकदा आपल्या रिपोर्टिंगमुळे चर्चेत आला आहे. यावेळी चांद नवाब यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी (President Alvi)  यांची मुलाखत घेतली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 

या व्हिडिओत रविवारी गोल्फ खेळत असलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत चांद नवाब यांनी गप्पा मारल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

जाणून घ्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या मुलाखतीमधील महत्वाच्या गोष्टी 

चांद नवाब यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींसमोर बूम धरून सुरूवात केले की, आपल्यासोबत आहेत सद्र ए पाकिस्तान डॉ आरिफ अल्वी साहेब. जे आज सुट्टीच्या दिवशी गोल्फ खेळत असून त्याचा आनंद लुटत आहेत. काय सांगणार सद्र साहेब आज? यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं की, पाकिस्तान आजा जी प्रगती करत आहे. त्याचा सगळ्यांना आनंद आहे. 

रेल्वे स्टेशनवाल्या व्हिडिओमुळे चर्चेत 

चांद नवाब एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीत रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या रिपोर्टिंगच्या स्टाईलमुळे अगोदरच चर्चेत आले आहे. एका रेल्वे स्टेशनवर रिपोर्टिंग करत असताना प्रवाशांमुळे झालेला त्रास कॅमेऱ्यात कैद झाला. त्यांना अनेकदा रिटेक घ्यावा लागला.  हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि याच व्हिडिओने चांद नवाब हे एका रात्रीत लोकप्रिय झाले. 

'बजरंगी भाईजान' सिनेमात नवाजुद्दीनने साकारली होती भूमिका

चांद नवाब यांचं रिपोर्टिंग इतकं लोकप्रिय झालं की, नवाजुद्दीनने ही भूमिका सिनेमात साकारली. 2018 मध्ये चांद नवाब यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. नवाजुद्दीनने ही साकारलेली भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली.