लंडन : लग्नाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त उत्साहाच्या भरात एका जोडप्याचे भान हरपले. वर्धापनदिन साजरा करताना हे जोडपे इतके उत्साही झाले की त्यांनी व्हायग्रा ऑनलाइन ऑर्डर केली. दाम्पत्याने दारूच्या अनेक बाटल्याही संपवल्या. पण सेक्स दरम्यान पती रक्तबंबाळ झाला. या अपघातात पतीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला. ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
ही घटना ब्रिटनमधील लिव्हरपूल येथील आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षीय मेकअप आर्टिस्ट इसाबेल वुल्फ आणि तिचा 32 वर्षांचा पती रॉब अँड्र्यू यांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष तयारी केली. त्यासाठी त्यांनी शहरापासून दूर एका सुंदर ठिकाणी रूम बुक केली होती. त्यांचा दिवस खास बनवण्यासाठी या जोडप्याने पूर्ण तयारी केली होती.
या जोडप्याने सांगितले की काही वेळातच दोघांनी शॅम्पेनच्या तीन बाटल्या रिकाम्या केल्या होत्या. यानंतर दोघेही खूप दारूच्या नशेत गेले होते. दरम्यान त्यांनी शारीरिक संबध प्रस्तापित केले. परंतू अचानक मोठा अपघात घडला पत्नीने तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. पतीला रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता, त्याचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांच्या उपचारानंतर पती झला.
सेक्स दरम्यान प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या घटना जगभरातून समोर येत आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीसोबत अपघात झाला होता. त्या 40 वर्षीय व्यक्तीचा खाजगी भाग फ्रॅक्चर झाला होता. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे प्रकरण प्रसिद्ध झाले आहे.
प्रायव्हेट पार्ट कधी फ्रॅक्चर होऊ शकतो?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, इरेक्शन दरम्यान पुरषांचा प्रायव्हेट पार्ट अचानक मधून वाकल्याने पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होऊ शकतो.
प्रायव्हेट पार्टमध्ये हाड नसले तरी रक्ताने भरलेल्या ट्यूब फुटू शकतात. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात.
प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चरच्या घटना क्वचितच घडतात, पण लाजेमुळे अनेकजण डॉक्टरांकडे जात नाहीत, असेही डॉक्टर सांगतात.