'हा' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे!

आजकाल हटके गोष्टी सोशल मीडियावर चटकन व्हायरल होतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 17, 2017, 06:50 PM IST
'हा' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे! title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : आजकाल हटके गोष्टी सोशल मीडियावर चटकन व्हायरल होतात. एखादी भारी गोष्ट किंवा कल्पना नेटकऱ्यांना चांगलीच भावते. हा फोटो देखील असाच आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागचे कारणही तसे खास आहे. 

फोटो पाहताच हे जोडपे एकमेकांच्या फारच प्रेमात आहे, असे दिसते. मात्र तो फोटो पूर्ण पाहिल्यानंतर अनेकांना गंमत वाटते. अँडी या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेल्या या फोटोला ४८ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. ‘माझी प्रेयसी मिथुन राशीची असली तरी मला ती खूप आवडते असं ट्विट करत अँडीने मिरर सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला आहे.’ पण हा फोटो नीट पाहिल्यावर लक्षात येईल की आरश्यात या दोघांचा चेहरा दिसत असला तरी प्रतिबिंबात मात्र त्याच्या प्रेयसीचे दोन चेहरे दिसतात. या सेल्फीमुळे अनेकजण चक्रावून गेले. नंतर मात्र अनेकांना या फोटोचा अर्थ समजला.

मिथून राशींच्या लोकांना अनेकदा ‘two-faced’ म्हणजेच दुतोंडी म्हणून चिडवले जाते. या राशींच्या लोकांचा एक वेगळा चेहरा असतो किंवा त्यांच्या वेगळा स्वभाव असतो ज्यापासून संपूर्ण जग अनभिज्ञ असतं आणि नेमकं हेच अँडीला दाखवून द्यायचं होतं म्हणून त्याने कलात्मकरित्या फोटो मॉर्फिंग केलं. अँडीची कल्पना लोकांना खूपच आवडली आहे. म्हणूनच त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.