Covid 19 च्या नव्या XE व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, WHO ने दिला गंभीर इशारा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता चिंता वाढवल्या आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण वाढत आहे.

Updated: Apr 3, 2022, 10:11 PM IST
Covid 19 च्या नव्या XE व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, WHO ने दिला गंभीर इशारा title=

मुंबई : जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच  WHO ने कोरोनाच्या नवीन XE प्रकाराबाबत नवा इशारा दिला आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक देशांमध्ये संसर्ग वाढत आहे. नवीन XE प्रकार हा Omicron subvariant - BA.1 आणि BA.2 या दोन व्हेरिएंटचे संयोजन असल्याचे मानले जात आहे. हा कोरोना विषाणूचा रीकॉम्बिनंट स्ट्रेन आहे, जो आता चिंतेचा विषय बनला आहे. WHO ने एका अहवालात म्हटले आहे की XE प्रकार पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये 19 जानेवारी रोजी आढळला होता.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते, नवीन प्रकार BA.2 सबव्हेरियंटपेक्षा 10 टक्के वेगाने पसरतो, ज्यामुळे तो अधिक संसर्गजन्य आहे.

नवीन स्ट्रेनवर संशोधन चालू असल्याने, संसर्गाबद्दल फारशी माहिती नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले की, "जागतिक आरोग्य संघटना इतर SARS-CoV-2 प्रकारांच्या नवीन प्रकारांच्या जोखमींचे बारकाईने निरीक्षण आणि मूल्यांकन करत आहे. अंमलबजावणीनंतर याची माहिती दिली जाईल."

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट तयार होत असून त्यामुळे संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लस घेतली असली तरी त्या या नवीन प्रकारावर किती प्रभावी ठकतील याबाबत अजून संशोधन सुरु आहे.

कोरोनाची लक्षणं नसली तरी देखील अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. एखाद्याची प्रतिकारशक्ती चांगली असली तर त्याला त्याचा कोणताही त्रास होत नाही. पण तो कोरोनाचा संसर्ग करु शकतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. अशा व्यक्तींना त्याचा अधिक धोका असतो.