आणखी एका शेजारील देशातील सरकार पडणार? पंतप्रधान राष्ट्रपतींच्या भेटीला

भारताच्या शेजारील आणखी एका देशातील सरकार संकटात

Updated: Apr 3, 2022, 08:56 PM IST
आणखी एका शेजारील देशातील सरकार पडणार? पंतप्रधान राष्ट्रपतींच्या भेटीला title=

कोलंबो : श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले आर्थिक संकट आता अधिक भीषण होत चालले आहे. श्रीलंकेतील अनेक शहरांमध्ये गेल्या आठवडाभरापासून नागरिकांकडून निदर्शने सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची किंमत आणि जीवनावश्यक साधनांची कमतरता यामुळे लोकं आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. त्यातच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याची बातमी पुढे आली आहे. 

श्रीलंकेचे दोन मंत्री नमल राजपक्षे आणि शशिंद्र राजपक्षे यांनीही गरज पडल्यास पद सोडण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. महिंदा राजपक्षे हे देखील आज राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात आले.

श्रीलंकेच्या मीडियानुसार, महिंदा आणि गोटबाया यांनी काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. राजपक्षे कॅबिनेट मंत्र्यांसह लवकरच राजीनामा देऊ शकतात, असे मानले जात आहे. यानंतर श्रीलंकेतील काळजीवाहू सरकारच्या माध्यमातून देशात पसरलेले असंतोषाचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.