Dawood Ibrahim भारताला घाबरला; कुटुंबियांना पाकिस्तानातून हलवलं

इमरान खान यांच्यावर दबाव 

Updated: Jan 19, 2021, 10:13 AM IST
Dawood Ibrahim भारताला घाबरला; कुटुंबियांना पाकिस्तानातून हलवलं

मुंबई : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम (Dawood Inbrahim) भरपूर घाबरलेला आहे. त्याच्या भीतीची तिव्रता इतकी आहे की, आता त्याने आपलं कुटुंबियांना पाकिस्तानमध्ये पाठवलेलं आहे. भारताकडून पाकिस्तानावर दहशतवादी नेटवर्क विरोधाकडून कारवाई करण्याचा दबाव आणला जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी इमरान खान सरकारने जॅश प्रमुख मसूद अजहर आणि मुंबई दहशतावादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जरी-उर-रहमान लखवीवर सक्ती दाखवलेली आहे. यामुळे आता दाऊद घाबरलेला आहे. त्याने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवलेलं आहे. 

कराचीमधून व्यवहार सुरूच 

भारताच्या IANS ने दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमने आपल्या कुटुंबियांमध्ये मुलगा दोन लहान भावांची मुलं यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवलं आहे. याअगोदर दाऊदने आपल्या मोठ्या मुलीला माहरुखला पोतुर्गालचं पासपोर्ट काढून दिलं होतं. माहरूखचं लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मिंयादाद यांचा मुलगा जुनैदसोबत झालं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दाऊद आता कराचीमधून आपले व्यवहार करत आहे. 

  दुबईत वसलाय भाई 

मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, दाऊदचा छोटा भाऊ मुस्तकीम अली कासकर (Mustakeem Ali Kaskar) अगोदरच दुबईत वसलेला आहे. तो संयुक्त अरब अमीरात, बहरीन आणि कतारमध्ये D कंपनीचा व्यवहार सांभाळत आहे. मुस्तकीमची संयुक्त अरब अमीरातच्या गारमेंटमध्ये फॅक्टरी चालवत आहे. तसेच D कंपनीतील जवळच्या व्यक्तींची देखरेख करतात. ज्यांना नुकतंच कराचीतून दुबईत पाठवण्यात आलं आहे. 

Anees Ibrahim गायब

कराचीमध्ये डिफेंस हाऊसिंग एरियामध्ये राहणारा दाऊदचा  भाऊ अनीस इब्राहिम (Anees Ibrahim) देखील गायब झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काहीच पत्ता नाही. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या ब्लास्टमधील आरोपी अनीस इब्राहिमने डी-कंपनीच्या व्यवहार पाहण्यासाठी आपल्या मुलांना मिडल इस्ट देशात शिफ्ट केलं आहे. तसेच दाऊदचा खास असलेला आणि वसुलीचं काम करणारा छोटा शकील देखील गेल्या काही दिवसांपासून गायब आहे.