बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम

Donald Gorske : विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका 70 वर्षांच्या व्यक्तीनं संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलंय. विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊनही त्यानं आपला फिटनेस काय ठेवलाय.

Updated: Mar 16, 2024, 07:13 PM IST
बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम  title=

Donald Gorske Burger Guinness World Record : अमेरिकेतील रहिवासी डोनाल्ड गोर्स्के यांचं नाव सध्या खूप चर्चेत आहे. ज्यांनी जगातील सर्वात जास्त बर्गर खाण्याचा विश्वविक्रम केलाय. डोनाल्ड गोर्स्के हे जगातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी केवळ आपला आवडता फास्ट फूड बर्गर पूर्णपणे खाल्ला नाही तर इतिहास देखील रचला आहे. 

सहसा फास्ट फूड खाल्ल्यानंतर लोकांची चरबी इतकी वाढते की, त्यांना चालणं अवघड होऊन बसतं. मात्र गोर्स्के  यांच्या बाबतीत तसं अजिबात नाही. त्यांचा फिटनेस अप्रतिम आहे. यामुळेच गोर्स्केचा फिटनेस आणि बर्गर खाण्याचे आकडे खूप चर्चेत आहेत. कारण डोनाल्ड गोर्स्के यांची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 

बर्गर खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले 70 वर्षीय डोनाल्ड गोर्स्के दररोज मॅकडॉनल्ड्समध्ये फ्रेश बर्गर खरेदी करण्यासाठी जात असत. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची बर्गरची आवड कायम राहिली. त्यांनी खाल्लेल्या प्रत्येक बर्गरचा हिशेब ठेवला. त्यांनी आतापर्यंत 34 हजारांहून अधिक बर्गर खाल्ल्याचा दावा केलाय. असं असूनही त्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नाही. मात्र बर्गर खाण्याबरोबरच ते दररोज 10 किलोमीटर चालतात.

अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील रहिवासी असलेले डोनाल्ड हे निवृत्त तुरुंग अधिकारी आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी आपले बर्गरकंटेनर आणि पावत्या सुरक्षित ठेवल्या आहेत. 1999साली त्यांनी या बाबतीत पहिला विश्वविक्रम केला होता. सुरवातीला ते रोज 9 बर्गर खात असत. नंतर त्यांनी ही संख्या कमी करून दोनवर आणली. एक दुपारच्या जेवणात आणि दुसरा रात्रीच्या जेवणात, असा नित्यक्रम सुरू ठेवला.

डोनाल्ड गोर्स्के सहसा भूक लागल्यावर बटाट्याचे चिप्स, फ्रूट बार आणि आईस्क्रीम खातात. त्यांची पत्नी मेरी यांनीही त्यांच्या आवडीला पाठिंबा दिला. गोर्स्के  यांनी 17 मे 1972 रोजी बर्गर खायला सुरूवात केली. झाली. 2023 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी 728 अतिरिक्त बर्गर खाल्ले, त्याआधीही हा विक्रम त्यांच्या नावावर होता. आता त्यांचा बिग मॅक बर्गर खाण्याचा आकडा 34,128 वर पोहोचलाय. याचाच अर्थ त्यांनी एका मोठ्या शहराला लागेल इतका बर्गर एकट्यांनं फस्त केलाय. सुमारे 52 वर्षांपूर्वी डोनाल्ड यांनी बर्गर खाण्याचा प्रवास सुरू केला. जो आजही सुरू आहे..