भारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी; म्हणाले....

अमेरिकेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Updated: Apr 8, 2020, 11:11 AM IST
भारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी; म्हणाले.... title=

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी बंद करू, अशी धमकी दिली. कोरोनासारख्या जागतिक साथीचा धोका वेळीच ओळखण्यात WHO ला अपयश आले. एवढेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटना चीनकडे अधिक लक्ष पुरवत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

इंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्याप्रमाणावर निधी पुरवला जातो. WHO चे चीनकेंद्री धोरण आणि सुरुवातीच्या काळात  कोरोना व्हायरससंदर्भात मी घेतलेल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय समूदायाने अयोग्य ठरवले होते. यानंतर चीनमधील कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी WHOकडून बीजिंगला अनुकूल अशी भूमिका घेण्यात आली होती. यानंतर WHO ने कोरोनाच्याबाबतीत चीनने पाळलेल्या पारदर्शक कारभाराचेही कौतुक केले होते. मात्र, चीनने अधिकृतपणे जाहीर केलेला मृतांचा आकडा खरा आहे किंवा नाही, याबाबत अजूनही शंकेचे वातावरण आहे. याबाबत WHO ला नेमकी माहिती असायला पाहिजे होती किंवा कदाचित त्यांना माहितीही असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले. 

अमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प

अमेरिकेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात आतापर्यंत तब्बल १४ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ८२,०३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या उत्पत्तीचे ठिकाण असलेल्या चीनमधील वुहान शहरातून लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. ७६ दिवसांनंतर पहिल्यांदाच वुहान शहराच्या सीमा झाल्या खुल्या झाल्या आहेत.