भारतात प्रवास करु नका, 'या' देशाचे आपल्या नागरिकांना आदेश

भारतातील कोरोना रुग्णसंख्या वाढली

Updated: Apr 20, 2021, 09:38 AM IST
भारतात प्रवास करु नका, 'या' देशाचे आपल्या नागरिकांना आदेश

नवी दिल्ली : भारत यात्रा (Travel to India) न करण्याचे आदेश अमेरिकेने (America) आपल्या नागरिकांना दिले आहेत. भारतातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकडेवारीनंतर अमेरिकेने हा निर्णय घेतलाय. अमेरिकेतील नागरिकांसाठी (American Citizen) नवे नियम आखण्यात आलेयत. 

भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेचा धोका वाढतोय. गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झालीय. या पार्श्वभुमीवर अमेरिकेने नियम जाहीर करत आपल्या नागरिकांना भारतात न येण्याचे निर्देश दिले. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांवर गेली आहे. दुसर्‍या  लाटेत   कोरोना संसर्ग झालेल्यांची आकडेवारी दुप्पट झाल्याचे दिसून येते. दरम्यान, केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. राज्यांव्यतिरिक्त रुग्णालये, नगरसेवकांना लस खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दिल्लीत रुग्णसंख्या वाढली

दिल्लीत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे आणि गेल्या  24 तासांत एकूण 25462 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर या काळात 161 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत कोविड -19चे  आतापर्यंत 8 लाख 53 हजार 460 लोकांना संसर्ग झाला असून 12121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 20159 लोक बरे झाले, तर कोरोना विषाणूच्या सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 74 हजार 941 झाली आहे.

यूपीत लॉकडाऊनला विरोध 

कुंभ मेळ्यानंतर उत्तरप्रदेशात रुग्ण झपाट्यानं वाढलेयत. 24 तासात 30 हजार 596 रुग्ण वाढलेयत. तर एका दिवसात 167जणांचा बळी गेला.तर लखनऊमध्ये 24 तासात 22 जणांनी जीव गमावला. यूपीत लॉकडाऊन लावण्यास योगी सरकारने नकार दिलाय. यूपीतील 5 शहरात लॉकडाऊनचे लावण्याचे निर्देश अलाहाबाद हायकोर्टाने दिले आहेत. पण उपजिवीकेचं कारण पुढे करत यूपी सरकारने लॉकडाऊनला विरोध केलाय.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 

राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,40,75,811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 3 (16.19टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37,43,968 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत.  तर 27,081 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.