नॉर्व्हे येथे बर्फाखाली गाडली गेलेय रहस्यमयी तिजोरी; जगाचा विनाश झाल्यावरच याचे कुलूप उघडणार

 जगाचा अंत जवळ आला आहे असे भाकित केले जात आहे. या प्रलयात प्रजातींसह मानव देखील नष्ट होऊ शकतात. यामध्ये केवळ जीवाणू, बुरशीच नव्हे तर झाडे-वनस्पती, सरपटणारे प्राणी, पक्षी, मासे सर्वच नष्ट होतील. तेव्हा या तिजोरीचे कुलूप उघडले जाईल. 

वनिता कांबळे | Updated: May 26, 2023, 04:56 PM IST
नॉर्व्हे येथे बर्फाखाली गाडली गेलेय रहस्यमयी तिजोरी; जगाचा विनाश झाल्यावरच याचे कुलूप उघडणार title=

Doomsday Vault Norway : अगदी मौल्यवान आणि महत्वाच्या वस्तू तसेच खजिना तिजोरीत ठेवला जातो. इतिहासात अनेक तिजोऱ्यांचा उल्लेख आढळतो. मात्र, सध्या जगात एक रहस्यमसी तिजोरी आहे. जिचे महत्व या जगाचा विनाश झाल्यावर कळणार आहे. यामुळे सध्या कुणी ही तिजोरी उघडली तरी याचा काहीच उपयोग होणार नाही.  जगाचा विनाश झाल्यावरच या तिजोरीचे कुलूप उघडले जाणार आहे. अंटार्टिका मधील नॉर्वे येथे ही  रहस्यमयी तिजोरी आहे. या तिजोरीला Doomsday Vault Norway असे म्हंटले जाते. ही तिजोरी पूर्णपणे बर्फाखाली गाडली गेली आहे. 

100 देशांचा या तिजोरीवर दावा

अंटार्टिका समुद्राजवळ नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन बेटावर ही रहस्यमी तिजोरी ठेवण्यात आली आहे. 100 देशांनी या तिजोरीवर दावा केला आहे. 2008 मध्ये ही तिजोरी तयार झाली. 100 अधिक देश या तिजोरीचा वापर करत आहेत. या तिजोरीचा वापर करण्यासाठी संबधीत देशाला नॉर्वे सरकारसोबत करार करावा लागतो. यासाठी संबधित देशाला नॉर्वे सरकारला शुल्क देखील द्यावे लागते.

काय आहे या रसस्यमयी तिजोरीत?

या रसस्यमयी तिजोरीत जगातील सर्वात मौल्यवान वस्तु आहे. याची किंमत पैशांत तोलता येणार नाही. या तिजोरीत बियाणे जतन करण्यात आली आहे. याला सीड बँक असे म्हणतात. याचे नाव Doomsday Vault असे आहे. जगभरातील 100 हून अधिक देशांनी लाखो प्रकारच्या धान्यांच्या बिया या तिजोरीत ठेवल्या आहेत. 

बियाणांच्या सुरक्षेची हमी

जसे आपण दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो आणि त्या बदल्यात शुल्क भरतो, त्याचप्रमाणे नॉर्वेची सीड व्हॉल्टही काम करते. यामुळे येथे संबधीत देशांची बियाणे अधिक सुरक्षित ठेवली जातात. जगाच्या एका कोपऱ्यात आणि अतिशय दुर्गम भाग समजला जाणाऱ्या अंटार्टिकामध्ये तिजोरी बांधण्याचे एक कारण म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच खूप थंडी असते. त्यामुळे धान्याच्या बिया कायम सुरक्षित राहतील. अशा दुर्गम भागात बियाणांची तिजोरी बनवली गेली कारण कोणत्याही युद्धाचा, कोणत्याही अणुस्फोटाचा धोका नाही. तसेच कोणताही देश येथे येत नाही. 

बियाणे जतन करण्यासाठी  तिजोरी का बनवली? 

जगात शेवटचा प्रलय सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी आला होता.  हा प्रलय इतका भयानक होता की डायनासोर सारखे महाविशाल प्राणी देखील पृथ्वीवरून नष्ट झाले. पुन्हा एकदा जगात अशाच प्रकारचा प्रलय येणार आहे.हवामान बदल याला कारणीभूत असेल.  संपूर्ण जगाचा विनाश झाला तर, पुन्हा जीवसृष्टी अस्तित्वात आणण्यासाठी या या सीड बँकेतील बिया महत्वाच्या भूमिका बजावतील. Doomsday Vault सीड बँकेत लाखो बियाणे जतन करण्यात आली आहेत. जगाचा विनाश झाल्यावर बियाणे जतन केलेल्या या तिजोरीचे कुलूप उघडले जाणार आहे. 

तिजोरीत ठेवलेली बियाणे  परत घेता येत नाही

या तिजोरीत ठेवलेली बियाणे परत घेण्याची परवानगी सबंधीत देशांना नाही. जेव्हा परिस्थिती बिघडते, युद्धादरम्यान, जेव्हा शेती संपुष्टात येते तेव्हा किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास ही बियाणे परत घेता येवू शकतात. 2010 नंतर सीरियामध्ये मोठा विध्वंस झाला होता. यावेळी त्यांची शेती उद्ध्वस्त झाली होती. अशा स्थितीत सिरीयाच्या मागणीनुसार त्यांना या तिजोरीतील काही बियाणे उपलब्ध करुन देण्यात आली.