धक्कादायक! पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला, जीवसृष्टीवर होईल असा होईल परिणाम?

तरी तांत्रिकदृष्ट्या हे अंतर 24 तासांपेक्षाही कमी आहे. 

Updated: Aug 1, 2022, 06:15 PM IST
धक्कादायक! पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला, जीवसृष्टीवर होईल असा होईल परिणाम? title=

Earth Rotation goes faster: पृथ्वी आपल्या अक्षाभोवती 24 तासात एक परिक्रमा पूर्ण करते परंतु नुकत्याच आलेल्या माहितीनुसार पृथ्वीने हे अंतर 24 तासाच्या आत पुर्ण केले आहे. 29 जुलै रोजी पृथ्वीने आपल्या अक्षाभोवती 1.9 मिलिसेकंदांपूर्वीच एक प्रदक्षिणा पूर्ण केली. हा आकाडा वाचून पृथ्वीने कमी केलेले अंतर हे फारच कमी वाटत असले तरी तांत्रिकदृष्ट्या हे अंतर 24 तासांपेक्षाही कमी आहे. 

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानूसार पृथ्वीच्या परिक्रमेचा वेग हा अलीकडे वाढतो आहे. परंतु अद्याप या गोष्टीचे ठोस कारण मात्र शास्त्रज्ञांना उमगले नाही. जर पृथ्वीचा वेग असाच वाढत राहिला तर हे जीवसृष्टीसाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते आणि याच्या परिणामामुळे पृथ्वीवरील संपर्क व्यवस्थेत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. 

असेही समोर आले आहे की प्रत्येक शतकात एक परिक्रमा पुर्ण करण्यासाठी ग्रह हे काही मिलिसेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतायत. 2020 मध्ये पृथ्वीच्या परिक्रमाच्या वेगानुसार 60 वर्षांतील सर्वात लहान महिना या वर्षी नोंदवला गेला होता. 19 जुलै 2020 चा दिवस 24 तासांपेक्षा 1.47 मिलीसेकंद कमी अंतराचा होता तर गेल्या वर्षीचा सर्वात लहान दिवस 2020 पेक्षा अंशतः मोठा होता.

पृथ्वीचा वेग अचानक का वाढला?
शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की हवामानातील बदल, सागरी लाटांच्या वेगाने बदलणाऱ्या हालचाली आणि पृथ्वीच्या गाभ्यातील बदल या गोष्टी पृथ्वीच्या परिक्रमेच्या वेगात वाढ होण्यास कारणीभूत आहे.

या बदलाचा नक्की काय परिणाम होईल? 
शास्त्रज्ञांना अद्याप या बदलाशी संबंधित परिणाम पूर्णपणे समजलेले नाहीत. पृथ्वीच्या परिक्रमेने वेग वाढवला तर एक सेकंद पूर्ण होण्यासाठी 1 शतक लागेल. अशा परिस्थितीत य़ाचा परिणाम म्हणून आपल्या वेळत 1 लीप सेकंद जोडले जाऊ शकते. पण असे नाईलाजास्तव केल्याने आपल्या अडचणी अजून वाढतील. विशेषतः जगातील माहिती आणि तंत्रज्ञानात या मोठा फटाका बसू शकेल कारण सगळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोजमाप त्यानूसार करावे लागतील. 

तंत्रज्ञानाला कसा बसेल फटका
संगणकावरील वेळ 23:59:59 पर्यंत जाऊन मग 60व्या सेकंदाला ती 00:00:00 होते. जर हीच वेळ एका सेकंदाने बदलल्यास संगणक प्रोग्राम क्रॅश होऊ शकतो असेही समजते आहे.