Meta Layoff 11000 Employees: फेसबुक (Facebook) आणि इन्टाग्रामची (Instagram) मूळ कंपनी असलेल्या मेटाने (Meta) आज मोठं पाऊल उचललं. मेटाच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. मेटाने तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. Facebook आणि Instagram ची मूळ कंपनी Meta Platforms Inc ने बुधवारी कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची घोषणा केली. त्याचं कारण देखील आता समोर आलंय.
कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर फेसबूकने कंपनीने ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील असाच एक निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, मेटाने विचार करून निर्णय घेतल्याची माहिती मार्क यांनी दिली आहे.
मी मेटाच्या (Meta) इतिहासातील सर्वात कठीण निर्णय घेतोय. मी माझ्या टीमचा सुमारे 13 टक्के भाग कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर आमच्या 11 हजारहून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकतोय, असंही मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) म्हणाले आहेत.
आणखी वाचा - Elon Musk Twitter: एलॉन मस्कच्या एका ट्विटने अमेरिकेत खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?
दरम्यान, आम्ही खर्चात घट करून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी अनेक अतिरिक्त पाऊलं उचलत असल्याचं देखील मार्क यांनी सांगितलंय. कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दीड महिन्याचा पगार दिला जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता जगभर फक्त मार्क झुकरबर्कचीच चर्चा होताना दिसत आहे.