व्हिडिओ: उंदराला घाबरून सापाने काढला पळ

उंदीर सापावर हल्ला करत आहे आणि साप तोंड दडवून पळताना व्हिडिओत दिसत आहे. 

Updated: Jul 10, 2018, 01:11 PM IST
व्हिडिओ: उंदराला घाबरून सापाने काढला पळ

बीजिंग: उंदीर हे सापाचे भक्ष्य. त्यामुळे अनेकदा उंदीर हे सापाला बिचकूनच असतात. आपणही अनेकदा साप उंदराला खात असल्याचे चित्र पाहिले आहे. पण, एखाद्या उंदराला चक्क सापावर हल्ला करताना किंवा त्याच्याशी लढताना तुम्ही पाहिले आहे का? नाही ना. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहा. या व्हिडिओत तुम्हाला साप विरूद्ध उंदीर असा सामना पहायाल मिळेल. हा सामना नुसता पहायलाच मिळणार नाही तर, उंदीर चक्क सापाला भारी पडत असल्याचेही पहायला मिळेल.

 चायनीज मीडियावर हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. साधारण एक मिनिट इतक्या कालावधीचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. आतापर्यंत एक मिनिटांचा हा व्हिडिओ १८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. उंदीर सापावर हल्ला करत आहे आणि साप तोंड दडवून पळताना दिसत आहे. तुम्ही व्हडिओ जर काळजीपूर्वक पाहाल तर उंदरासमोर साप अगदीच असहाय झाला आहे.