न्यूयॉर्कमध्ये मेट्रो स्टेशनवर फायरिंग, स्टेशनवर रक्ताचा सडा

न्यूयॉर्कमध्ये मेट्रो स्टेशनवर फायरिंग झालं आहे, यात सुरुवातीला १३ जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांनी एका

Updated: Apr 12, 2022, 07:42 PM IST
न्यूयॉर्कमध्ये मेट्रो स्टेशनवर फायरिंग, स्टेशनवर रक्ताचा सडा title=

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये मेट्रो स्टेशनवर फायरिंग झालं आहे, यात सुरुवातीला १३ जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.अंडरग्राऊंड असलेल्या स्टेशनमध्ये ही फायरिंग झाली आहे, हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक हातबॉम्ब फेकल्यानंतर फायरिंग केलं आहे. 

ब्रुकलिन रेल्वे स्टेशनवर एक जिवंत बॉम्ब सापडला आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये सर्व मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. हल्लेखोर हा गॅस मास्क घालून आला होता. बांधकाम करणाऱ्या कामगाराप्रमाणे कपडे घालून हल्लेखोर आला होता. गोळीबारानंतर या स्टेशनवर रक्ताचा सडा पडला आहे.