न्यूयॉर्क : अमेरिका (America) च्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लीम बांधवांनी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये नमाज पठण केलं. शनिवार मोठ्या संख्येत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्याची सुरूवात केली. पण सोशल मीडियावर मात्र याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकून रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य आहे का? अस प्रश्न उपस्थित होत आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, टाइम्स स्क्वेअर फार वर्दळीचं ठिकाण आहे. पर्यटक देखील मोठ्या संख्येने याठिकाणी हजेरी लावत असतात. नमाज पठणानंतर आयोजक म्हणले की, 'इस्लाम धर्माबाबत प्रत्येकाचा चुकीचा समज आहे...'
ते पुढे म्हणतात, 'इस्लाम शांतीचा धर्म आहे...' सांगायचं झालं तर, इस्लाम धर्मामध्ये रमजान पवित्र महिना मानला जातो. शनिवार पासून रमजान महिन्याची सुरूवात झाली आहे.
दरम्यान, UAE चे Social Media Influencer हसन सजवानी यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं मत मांडलं.
This creates inconvenience to other people, there are more 270 mosques in NYC alone, and better places to pray … no need to block public access to show off your religion! This is not what Islam preaches … https://t.co/4AKaoWMlhX Hassan Sajwani (@HSajwanization) April 4, 2022
हसन सजवानी म्हणाले, 'न्यूयॉर्कमध्ये 270 पेक्षा जास्त मशिदी आहेत. नमाज पठण करण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. आपल्या धर्माचं प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर नमाज पठण करण्याची गरज नाही. इस्लाम आपल्याला हे शिकवत नाही...' सध्या हसन सजवानी यांचं ट्विट व्हायरल होत आहे.