मुंबईः महासागरातील अनेक रहस्ये आणि रहस्यमय प्राणी आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक पारदर्शक मासा पाहून तुमचा विश्वास बसणार की, मासाही रंग बदलतो.
सरडा रंग बदलतो हे तुम्ही ऐकलंच असेल. पण तुम्ही कधी माशाचा रंग बदलल्याचे ऐकले किंवा पाहिले आहे का? नसेल तर आधी ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा, ज्यावर सर्व सोशल मीडिया यूजर्सना विश्वास ठेवणे कठीण होत आहे.
हा मासा पाण्यातून बाहेर येताच पारदर्शक म्हणजेच रंगहीन होतो. तुम्हाला तो काचेचा मासा असल्यासारखे वाटेल. जेव्हा हा मासा पाण्यात असतो तेव्हा त्याचा रंग काळा असतो आणि पाण्यातून बाहेर काढताच तो रंगहीन होतो.
Glass squid that changes color instantly.
pic.twitter.com/SCyRirE9cG— Figen (@TheFigen) May 14, 2022
या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीने पाण्यातून मासा पकडला, त्याच्या हाताची बोटेही दिसत आहेत. या व्यक्तीने हा मासा पाण्यात सोडताच तो मासा पुन्हा काळा होतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. Cranchiidae या प्रकारात ग्लास स्क्विडच्या सुमारे 60 प्रजाती आहेत. या माशांची लांबी 10 सेंटीमीटर ते 3 मीटर पर्यंत असू शकते.