पाकिस्तानच्या 'या' माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता १,०३,६७१ इतका झाला आहे. 

Updated: Jun 8, 2020, 05:23 PM IST
पाकिस्तानच्या 'या' माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण title=

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना कोरोनाची Coronavirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाझ) प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शाहिद अब्बासी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत:ला घरात क्वारंटाईन करुन घेतले आहे. यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तेदेखील सध्या आयसोलेट (अलगीकरण) झाले आहेत. 

पाकिस्तानातील 'डॉन' दैनिकाच्या संपादकांकडून योगी आदित्यनाथांचे कौतुक

पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता १,०३,६७१ इतका झाला आहे. यापैकी ३४, ३५५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर २,०६७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन पाकिस्तानच्या डॉन Dawn या ख्यातनाम दैनिकाचे संपादक फहद हुसैन यांनी इम्रान खान सरकारला धारेवर धरले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानपेक्षा उत्तर प्रदेशातील योगी सरकारने कोरोनाला चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊन राबवला. पाकिस्तानात इम्रान खान सरकारला हे जमले नाही. उत्तर प्रदेशच्या तुलनेत पाकिस्तानातील लोकसंख्येची घनता कमी आहे. तसेच पाकिस्तानातील लोकांचे दरडोई उत्पन्नही जास्त आहे. तरीदेखील उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यात बऱ्याच अंशी यश आले. तसेच पाकिस्तानातील मृत्यूदरही उत्तर प्रदेशपेक्षा जास्त असल्याचे फहद हुसैन यांनी म्हटले आहे.