टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (elon musk) यांनी ट्विटरची (twitter) सुत्रे हातात घेऊन आठवड्याभरातच घेतलेल्या निर्णयांनी सगळ्या ट्विटर जगताचं टेन्शन वाढवलं आहे. एलॉन मस्क यांनी घेततेल्या निर्णयांची सध्या जोरदार चर्चा सुरुय. ट्विटरवर आता मुक्तपण व्यक्त होता येणार असणार आहे अशी घोषणा मस्क यांनी कंपनीची मालकी घेतालच केली होती. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच माजी व्यवस्थापकीय संचालक पराग अग्रवाल (parag agrawal) यांच्यासह सर्व बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच मस्क यांनी ट्विटरमधून कर्मचाऱ्याची कपात केलीय. पण आता ट्विटरच्या एका माजी कर्मचाऱ्याने युजर्सच्या गोपनीयतेबाबत धक्कादायक दावा केला आहे.
स्टीव्ह क्रेन्झेल (Steve Krenzel) या व्यक्तीने केलेल्या ट्विटने खळबळ उडवली आहे. स्टीव्ह आणि त्यांच्या टीमला एका मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपनीने (telecom company) युजर्स त्यांचे घर कधी सोडतात, ते कामावर कसे जातात आणि दिवसभरात काय करतात याचा मागोवा घेण्यास सांगितले होते. दिवसभरात तुम्ही केव्हा कुठे जाता, अशी सर्व माहिती गोळा करण्यास सांगितले होते. स्टीव्ह क्रेन्झेल 2015 ते 2017 दरम्यान ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर (software engineer) म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांना केलेल्या दाव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलय.
"गेल्या आठवड्यात ट्विटरच्या मालकी दुसऱ्याकडे गेल्यामुळे, मी ट्विटरवर काम करताना मला सांगितलेल्या सर्वात चुकीच्या गोष्टीबद्दल बोलण्यास तयार आहे, असे स्टीव्ह यांनी म्हटले आहे. ही घटना 2015 ते 2016 दरम्यान घडली जेव्हा डिक कॉस्टोलो (Dick Costolo) यांनी ट्विटरची सुत्रे स्विकारली होती आणि जॅक डोर्सी (Jack Dorsey) ट्विटरचे सीईओ म्हणून काम पाहत होते.
हेही वाचा >> Twitterवर एक चूक आणि तुमचे अकाऊंट कायमचे होईल सस्पेंड; एलॉन मस्क यांची नवी घोषणा
"मी उदयोन्मुख बाजारपेठा असलेल्या ब्राझील, भारत, नायजेरिया इत्यादी देशांमध्ये ट्विटर युजर्ससाठी सुधारणा करण्यासाठी एका टीममध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होतो. यासाठी मोबाइलवर बरेच काम होते आणि यामध्ये बँडविड्थ, मेमरी वापर, बॅटरीचा वापर कमी करण्याचा समावेश होता. आमच्या मोबाइल अॅपमधून लॉग अपलोड करण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे हे मी काम सुरुवातीला केले," असे स्टीव्ह म्हणाले.
When we sent this data to the telco they said the data was useless. They switched their request and said they want to be able to tell how many of our users are entering their competitors’ stores.
A bit sketchier, but maybe workable in a privacy respecting way?
— Steve Krenzel (@stevekrenzel) November 7, 2022
क्रेन्झेल यांना टीममध्ये मोबाईल लॉग गाय म्हणून ओळखले जाऊ लागले. क्रेन्झेल यांनी सांगितले की त्यांना सेल्स टीमसोबत जोडले गेले. "एक मोठी टेल्को (टेलिकॉम कंपनी) आम्हाला उत्तर अमेरिकेतील लॉग सिग्नल स्ट्रेंथ डेटा घेऊन पैसे देणार होती," असे क्रेन्झेल म्हणाले.
युजर्सची ओळख लपवेल अशी ग्रॅन्युलॅरिटी शोधण्यासाठी क्रेन्झेल यांनी डेटा सायन्सवर काम केले. “जेव्हा आम्ही हा डेटा टेल्कोला पाठवला तेव्हा त्यांनी सांगितले की डेटा निरुपयोगी आहे. त्यांनी मागणी बदलली आणि सांगितले की आमचे किती युजर्स त्यांच्या स्पर्धकांच्या उत्पादनांचा कधी वापर करतात हे जाणून घ्यायचे आहे," असे क्रेन्झेल म्हणाले. जेव्हा टेलिकॉम कंपनीने आम्ही दिलेल्या डेटावर नाराजी व्यक्त केली तेव्हा ट्विटरतर्फे मला त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले. त्यांना नक्की काय हवंय हे जाणून घेण्यासाठी ट्विटरने मला त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवलं, असे क्रेन्झेल म्हणाले.
Johnny Sins : जॉनी सिन्सची लहानपणीची इच्छा होणार पूर्ण; एलॉन मस्क यांच्याकडे मागितली मदत
यानंतर त्यांनी कंपनीच्या संचालकांची भेट घेतल्याचे क्रेन्झेल यांनी सांगितले. कंपनीचे संचालक म्हणाले की युजर्स त्यांचे घर कधी सोडतात, ते कामावर कसे जातात आणि दिवसभर कुठे फिरतात हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. क्रेन्झेल यांनी दावा केला की संचालकाने त्यांना सांगितले की त्यांना इतर कंपन्यांकडून असाच अधिक तपशीलवार डेटा मिळाला आहे.
सॉफ्टवेअर अभियंता क्रेन्झेल यांनी डेटा देण्यास नकार दिला आणि ट्विटरचा राजीनामा दिला. ऑफिस सोडण्यापूर्वी क्रेन्झेल यांनी जॅक डोर्सीला ई-मेल केला होता. त्यावर जॅक डोर्सीने "मला या प्रकरणात आधी लक्ष घालावे लागेल. मी पाहतो की कोणताही गैरसमज नाही. हे बरोबर वाटत नाहीये. आपण हे करू शकत नाही," असे उत्तर दिल्याचे क्रेन्झेल म्हणाले.