पॅरिस : इस्लामिक दहशतवादी घटनानंतर फ्रान्समधील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशात दुसरे लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. साथीच्या रोगाची दुसरी लाट थांबविण्यासाठी हा लॉकडाऊन केला गेला आहे. ही घोषणा गुरुवारी रात्रीपासून अंमलात आली असून देशातील ६.७ कोटी नागरिकांना किमान डिसेंबर सुरुवातीपर्यंत घरातच राहावे लागणार आहे. ही घोषणा अंमलात येण्यापूर्वीच गुरुवारी संध्याकाळी पॅरिसच्या रस्त्यावर आणि आजूबाजूच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. न्यूज एजन्सी एपीच्या माहितीनुसार, सुमारे ७०० कि.मी.पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.
फोटो - @thedaytotwit
नवीन लॉकडाऊन सुमारे एक महिन्यासाठी लागू असणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनची गुरुवारी मध्यरात्री अंमलात करण्यापूर्वी नागरिक त्यांच्या त्यांच्या शहरांमध्ये खरेदी करण्यासाठी तसेच आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडले. तसेच आणखी एक मोठे कारण म्हणजे शनिवार आणि रविवारची संत दिन सुट्टी होती. त्यामुळे लोक घराबाहेर पडलेत. इतर शहरी- ग्रामीण भागातील लोकही घराबाहेर पडले होते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
फ्रान्समध्ये २४ तासांत कोरोनाचे, ४७,६३७७ नवीन रुग्ण आढळले आणि एकूण रूग्णांची संख्या १३,२७,८५२ वर पोहोचली आहे, तर साथीच्या दुसरी लाट रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या वाढून ३६०५८ झाली आहे, तर सध्या २१,१८३ संक्रमित रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी ३,१५६ अतिदक्षता विभागात आहेत.
P10302020 #Traffic around #Paris hit record levels with 430 miles of queues (700 km) hours before a new national #lockdown came into force across #France to tackle spiralling #Covid infections. People were ordered to stay at home except for essential work or medical reasons. pic.twitter.com/1d7LdPDfEE
— The Day Today (@thedaytotwit) October 30, 2020
दरम्यान, जे लोक घरून काम करू शकत नाहीत, त्यांना कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. आपल्याला अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्यास मुभा असणार आहे. अगदी आरोग्य आपत्कालीन आणि रोजच्या व्यायामाच्या एका तासासाठीही शिथिलता असणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यास सांगितले आहे. बार, कॅफे, जिम आणि रेस्टॉरंट्ससह अनावश्यक दुकाने बंद राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
खासगी मिटिंग आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार नाहीत. सहा वर्ष आणि त्यापेक्षा मोठ्या वयाच्या शाळकरी विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी १० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना ते बंधनकारक असणार आहे.