हाफीज सईदने स्वत:च्या पक्षासाठी उघडलं लाहोरमध्ये ऑफीस

मिल्ली मुस्लिम लीग हा जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा आहे.

Updated: Dec 25, 2017, 02:43 PM IST
 हाफीज सईदने स्वत:च्या पक्षासाठी उघडलं लाहोरमध्ये ऑफीस title=

लाहोर : मिल्ली मुस्लिम लीग हा जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा आहे.

मिल्ली मुस्लिम लीगची स्थापना

पाकिस्तान सरकारकडून दिल्या गेलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून हाफीज सईदने लाहोरमध्ये पक्षाचं कार्यालय सुरू केलंय. हाफीज सईद लष्कर-ए-तोयबाच्या आणि जमात-उद-दावा या दहशतवादी गटांचा म्होरक्या आहे. त्याने मिल्ली मुस्लिम लीग या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. 

नजरकैदेतून सुटका

हाफीज सईदची अलिकडेच पाकिस्तानच्या कोर्टाने सुटका केली आहे. त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. तब्बल 297 दिवस तो नजरकैदेत होता. त्याच्या सुटकेवरून गदारोळ झाला होता. भारतासहित अमेरिकेने याचा निषेध नोंदवला होता.
 
लाहोरमध्ये कार्यालय

आपल्या मिल्ली मुस्लिम लीग या राजकीय पक्षाचं कार्यालय सईदने लाहोरमधल्या मोहनी रोडवर थाटलं आहे. कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर त्याने तिथल्या स्थानकांशी संवाद साधला. पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सईदच्या राजकीय पक्षाच्या निवडणुक आयोगाकडे नोंदणीला विरोध केलाय. 

परवेझ मुशर्रफचा पाठिंबा

अर्थात अजून सईदच्या राजकीय पक्षाची नोंदणी व्हायची आहे. पण पक्षाने आपल्या राजकीय हालचालींना सुरूवात केली आहे. मंहमद याकूब शेख हा पक्षाचा स्थानिक निवडणुकांसाठीचा उमेदवार आहे. परवेझ मुशर्रफ यांनी हाफीज सईदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.