कोरोनानंतर 'या' विषाणूचा धोका; चीनचा इशारा

चीनमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  

Updated: Jul 6, 2020, 10:51 AM IST
कोरोनानंतर 'या' विषाणूचा धोका; चीनचा इशारा

बीजिंग : जगात कोरोना व्हायरसने थैमान घतलं आहे. चीनमध्ये उदयास अलेल्या या व्हायरसचं वादळ सर्वच राष्ट्रांसाठी एक मोठं संकट ठरत असून चीनमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चीनमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनमधील एका सरकारी मीडियाने या बातमीला दुजोरा दिला आहे. 

पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसऱ्या स्तरावरील इशारा दिला आहे. बयन्नुरच्या एका रुग्णालयात शनिवारी ब्यूबॉनिक प्लेगचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाने जारी केलेला अर्लट २०२० या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. 

सध्या शहरामध्ये हो रोग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणाकरता जागृत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, भविष्यात हा विषाणू डोकं वर काढण्याची शक्यता संशोधकांनी देखील वर्तवली आहे. या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत आहे. विषाणू कोरोना सारखा आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे जगभरात याचा संसर्ग टाळता येणार नाही असं वृत्त बीबीसीने दिलं आहे.