Snake Escaped from Zoo - आपण सर्वजण अनेकदा प्राणी संग्रहालयात जातो. इथे आपल्याला अनेक प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी म्हणजेच साप किंवा नाग ठेवलेले पाहायला मिळतात. जे प्राणी सर्वात डेंजर किंवा ज्याची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते असे प्राणी पाहायला आपल्याला आवडतं. यामध्ये वाघ, सिंह, अस्वल किंवा विषारी साप, नाग किंवा मगर, सुसर असे प्राणी आपण आवर्जून पाहतो. मात्र कधी तुम्ही विचार केला आहे का, की त्याच प्राणी संग्रहालयातील वाघ किंवा किंवा एखादी मगर तो पिंजरा तोडून बाहेर पडले तर? असाच काहीसा प्रकार घडला आहे स्वीडनमध्ये. स्वीडनच्या एका प्राणी संग्रहालयामधून चक्क एक घातक, विषारी साप, किंग कोब्रा पळून गेल्याची बातमी आली आणि सर्वांचे धाबे दणाणले. हा साप नक्की कुठे गेला? कुणाच्या घरात तर घुसला नाही ना? हे तपासण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.
किती मोठा होता हा अत्यंत घातक आणि विषारी किंग कोब्रा? तर हा प्राणिसंग्रहालयातून पळ काढणारा किंग कोब्रा होता तब्बल 2.2 मीटर म्हणजेच सात ते सव्वा सात फूट लांब. या किंग कोब्राचं नाव सर वास Sir Vass (Sir Hiss) किंवा हौदुनी असल्याचं बोललं जातंय. स्कॅन्सन ऍक्वेरियमचे CEO जोनास वोल्हमस्ट्रॉंम यांनी याबाबत तिथल्या माध्यमांना माहिती दिली होती.
किंग कोब्रा साप ज्याला आपण भारतात नाग बोलतो यांची लांबी तब्बल 5.5 मीटर म्हणजे 18 मीटर एवढी असू शकते. त्यांचं विष हे अत्यंत जहरी, घातक न्यूरोटॉक्सिन असतं. कुणा माणसाच्या शरीरात जर हे विष गेलं, तर त्याचा थेट तुमच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो आणि तुमचा जीवही जाऊ शकतो.
थंडीच्या दिवसांमध्ये हे साप आपल्या बिळांमध्ये राहतात कारण त्यांचं रक्त थंड असतं थंडी त्यांना सहन होत नाही. अशात सर हीस स्वीडनमधील गार वातावरणात फिरायला निघाले. अशात या प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की हा साप बाहेर जास्त काळ तग धरू शकणार नाही. कारण बाहेरील अतिशीत वातावरणात त्याचा मृत्यू झाला असता. मात्र, सात दिवसांनी हा साप परत प्राणी संग्रहालयात परत आल्याचं समजतंय.
हा घातक विषारी साप 22 तारखेला त्या ऍक्वेरियममधून पळाला होता. या सापाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ते ठिकाण स्टॉकहोममधील जिर्गदान बेटावरील खुलं प्राणी संग्रहालयाचा एक भाग आहे. या सापाला शोधण्यासाठी एक्स रे मशिन्सचा वापर केला गेला. यामध्ये हा साप भिंतींमधील भेगांमध्ये लपला असल्याचं आढळून आलेलं. त्याला तिथून काढण्यासाठी तिथे ड्रिल देतील करण्यात आलं. मात्र हा साप त्या शोधकर्त्यांना चकमा देऊन तिथूनही पळाला होता. मात्र तब्बल सात दिसांनी आता हा साप प्राणी संग्रहालयात परतला आहे.
hingly venomous king cobra escapes from zoo based in sweden returned after seven days