पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई: नोबेल पुरस्कार हे प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. नोबेल पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रासह मोठी रक्कम दिली जाते.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका संस्थेला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार इ.स. 1901 मध्ये देण्यात आला.
नोबेल पारितोषिकासाठी नामांकन कसे केले जाते. आणि या पुरस्कारांसाठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पुरस्कारासाठी कोणीही सामान्य माणूस अर्ज करू शकतो का? चला तर पाहुयात नोबेल पुरस्कार कसा मिळवायचा? पुरस्कारसाठी कोण निवड करतो? यासंबंधी सर्व माहिती...
नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणीही नामांकन करू शकतो, फक्त काही अटी आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. नोबेल पारितोषिक प्रदान करणाऱ्या समितीने नामांकनासाठी काही निकष निश्चित केले आहेत. समिती यासाठी कोणतेही निमंत्रण पत्र जारी करते आणि ज्यांना निमंत्रण मिळेल तेच त्यासाठी अर्ज करू शकतात, असे नाही. नोबेल पारितोषिकांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ज्यांना नामांकन मिळाले आहे त्यांची नावे 50 वर्षांपासून उघड केली जात नाहीत.
नोबेल पुरस्काराची निवड करण्यासाठी एक समिती असते. जी पुरस्कार विजेत्यांची निवड करते. नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनासाठी पात्र असलेले कोणीही व्यक्ती पाठवू शकतात.
नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार, खालीलपैकी एका श्रेणीतील व्यक्तीने अर्ज सादर केल्यास तो वैध मानला जातो. याशिवाय, स्वतःहून अर्ज केलेले नामनिर्देशन वैध मानले जात नाही. यात कोणत्याही विधानसभेचा मंत्री, लोकशाही सरकार किंवा राज्य प्रमुख अर्ज करु शकतात. त्याचबरोबर हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य आणि हेगमधील लवादाच्या स्थायी न्यायालयाचे सदस्य. l'Institut de Droit International चे सदस्य. वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडमच्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या सदस्या. नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्ती. मुख्य संचालक मंडळाचे सदस्य किंवा त्याच्या समकक्ष संस्था ज्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे वर्तमान आणि माजी सदस्य. त्याचबरोबर नॉर्वेजियन नोबेल समितीचे माजी सल्लागार.
रविंद्रनाथ टागोर 1913 साहित्य, सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण 1930 भौतिकशास्त्र, हरगोविंद खुराणा 1968 वैद्यकशास्त्र, मदर टेरेसा 1979 शांतता पुरस्कार, सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983 भौतिकशास्त्र, अमर्त्य सेन 1998 अर्थशास्त्रासाठी, सर व्ही. एस. नायपॉल 2001 साहित्य, वेंकटरमणन रामकृष्णन 2009 रसायनशास्त्र, कैलाश सत्यार्थी 2014 शांतता पुरस्कार, अभिजीत बॅनर्जी 2019 अर्थशास्त्र
2022 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत वेबसाइटनुसार 343 उमेदवार होते. त्यापैकी 251 व्यक्ती आणि 92 संस्था होते. मागच्या वर्षी 329 लोक होते. जे मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी जास्त होते. 2016 मध्ये 376 उमेदवारांनी नोंदणी केली होती. जी विक्रमी संख्या होती. ही सर्व माहिती घेऊन तुम्ही देखील पात्र असाल तर नोबेल पुरस्कारासाठी अर्ज करु शकता.