सूर्यावर महाकाय खड्डे? पृथ्वीच्या दिशेनं येतंय भलंमोठं संकट? काय आहे तज्ज्ञांचा दावा

सूर्यावर अनेक ठिकाणी विशालकाय खड्डे (Giant Craters) तयार झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय.

Updated: Dec 4, 2022, 07:54 PM IST
सूर्यावर महाकाय खड्डे? पृथ्वीच्या दिशेनं येतंय भलंमोठं संकट? काय आहे तज्ज्ञांचा दावा title=

Huge Cracks In The Sun : निसर्गचक्रात अनेक बदल होत आहेत. हिवाळ्यामध्ये पाऊस आणि पावसाळ्यात कडक ऊन अशी स्थिती आपण वारंवार अनुभवतोय. मात्र आता संशोधकांनी पृथ्वीसाठी (Earth) आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. सूर्य फाटतोय, त्यामुळे सूर्यावर अनेक ठिकाणी विशालकाय खड्डे (Giant Craters) तयार झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय.

दरम्यान हे खड्डे इतके मोठे आहेत की त्यात पृथ्वीसारखे कितीतरी ग्रह सहजपणे सामावू शकतात. या महाकाय खड्ड्यांमधून उष्णतेच्या लहरी बाहेर पडत आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये त्याचा पृथ्वीवर मोठा परिणाम दिसू शकतो, असाही दावा करण्यात येतोय. 

सूर्यावरील या महाकाय खड्ड्यांना संशोधकांनी कोरोनल होल असं म्हंटलंय. हे खड्डे सूर्याच्या मध्यभागी आढळून आले आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सनस्पॉट्स म्हणजे चमकणाऱ्या ठिपक्यांमधून चुंबकीय उर्जा उत्सर्जित होत असते त्यांचा सूर्याभोवतालच्या वातावरणात स्फोट झाल्यानंतर सौर वादळ तयार होतं. त्यामुळेच सूर्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याचं दिसून येतं. 

बऱ्याचदा सूर्यावरील सौरवं वादळं सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौरमालिकेत सगळीकडे पसरतं. त्यामुळे सूर्यावरील महाकाय खड्ड्यांबाबत संशोधकांनी भीती व्यक्त केली आहे. या खड्ड्यांमुळे पृथ्वीच्या दिशेनं एक महाकाय वादळ येतंय. ज्याला जिओ मॅग्नॅटिक स्टॉर्म असं म्हंटलं जातं. या वादळामुळे पृथ्वीची फार मोठी हानी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्याचा विजनिर्मीती तसच सॅटेलाईटवर प्रभाव पडू शकतो. शिवाय टीव्ही आणि मोबाईल फोन्स बंद पडू शकतात.