Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु असतानाच आणखीन एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आळी आङे. गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेके याची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. अनेक गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार होता. 2017 साली सुक्खा सिंग पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. तो पंजाबमधील मोगा येथील रहिवाशी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विग्निपेगमध्ये 2 टोळ्यांत झालेल्या संघर्षामध्ये सुक्खाची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'अत्यंत सावध राहा कारण...'
सुक्खा हा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये देविंदर बंबीहा टोळीचा कारभार पाहत होता. तो या टोळीसाठी निधी गोळा करण्याचं काम करायचा. तो खोट्या पासपोर्टच्या आधारे 2017 साली कॅनडामध्ये पळून गेला. तो खलिस्तानी फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता असं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र तो प्रामुख्याने खंडणी मागणे, लोकांना धमकावणे आणि सुपऱ्या घेऊन हत्या करण्याची कामं करायचा. सुक्खा आणि त्याच्या टोळीतील इतर लोक हे वेगवेगळ्या राज्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत आहे. सुक्खा हा पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतामध्ये प्रामुख्याने सर्व गुन्हेगारी स्वरुपाची कामं करायचा.
नक्की वाचा >> भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा
मागील वर्षीच सुक्खाने पंजाबमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला होता. 14 मार्च रोजी सुक्खाने जलंधरमधील सहकाऱ्यांच्या मदतीने मल्लिया गावात एका कब्बडी सामन्यादरम्यान खेळाडू संदीप सिंग नंगलची हत्येचा कट रचला होता. यानंतर पंजाब पोलिसांनी या टोळीतील सदस्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 20 गुन्हे दाखल केले होते. गुप्तचर एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, भारताविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना आर्थिक पमदत करत आहे. कॅनडामधील खलिस्तानी नेते, खास करुन खलिस्तानी लिबरल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटिक पार्टीला वैंकूवर येथे आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून नियमितपणे अर्थ पुरवठा केला जातो असं वृत्त न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
नक्की वाचा >> कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'
18 जून रोजी कॅनडामधील सुरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर कॅनडामधील सिख फॉर जस्टिस आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.
हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता असा कॅनडीयन पंतप्रधानांनी आरोप केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून भारताने ते फेटाळले आहेत. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमधील संबंध आणखीन ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
IND
(46.5 ov) 148/3 (113 ov) 471
|
VS |
ENG
465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.