Best Traditional Vegan Dishes in the World : भारतीय संस्कृतिचा बोलबोला जगात असताना आता भारतीय खाद्यपदार्थांची चव जगात भारी झाली आहे. कारण सात भारतीय खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील मिसळ पाव याच्यासह राजमा राईस यांनाही यात स्थान मिळाले आहे. दरम्यान, 2022 मध्ये जगातील सर्वोत्तम पाककृतींच्या जागतिक यादीत रँकिंगमध्ये भारत पाचव्या स्थानावर होता.
फास्टफूडच्या जमान्यात भारतीय पदार्थांची ओळख जगात होत असल्याने प्रत्येक भारतीयाला समाधान नक्कीच वाटेल. शाकाहारीपणा ही एक जीवनशैली आहे. त्यात भारतीय पदार्थ्यांना जागतिक ओळख मिळत असल्याने याचे सगळ्यांनाच कौतुक आहे. जगात भारतीय पदार्थांना मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण भारतीय पाककृती लोकांना अधिक आवडत असल्याचे दिसून येत आहे. चविष्ठ खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. परदेशात आता भारतीय उपहारगृह पाहायला मिळत आहेत. तसेच भारतीय मसाले यांचीही विक्री होताना दिसून येत आहे.
अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांत अनेक मराठी हॉटेल व्यवसायिक पाहायला मिळतात. या ठिकाणी भारतीय पदार्थ्यांना मागणी वाढलेली दिसून येत आहे. आता तर जगातील सर्वोत्तम शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत मिसळ पाव याचा समावेश झाला आहे. हा पदार्थ 11 व्या स्थानी आहे. यामुळे महाराष्ट्राची मान अधिक उंचावली आहे. मिसळ म्हटले की झणझणीत डीश डोळ्यासमोर उभी राहते. रस्सा, कट आणि कांदा, लिंबू, शेव-चिवडा किंवा फरसाण याचे मिश्रण आणि सोबतीला पाव असतो.
मिसळ पावसोबत आणखीकाही पदार्थ आहेत. यात आलू गोबी 20 व्या स्थानावर आहे. तर 22 व्या स्थानी राजमा आहे. 24 व्या स्थानावर कोबी मंच्युरियन आहे. या यादीतील इतर भारतीय पदार्थांमध्ये मसाला वडा, भेळपुरी आणि राजमा चावल यांचा समावेश आहे, जे अनुक्रमे 27, 37 आणि 41 व्या स्थानावर आहेत. तसेच मसाला वडा, जो 27 व्या क्रमांकावर आहे. हा एक पारंपारिक भारतीय फ्रिटर आहे जो तामिळनाडूमधून आला आहे.
प्रत्येकाचा आवडता स्नॅक म्हणजे भेळपुरी. हा एक चवदार नाश्ता आहे. जो सामान्यतः संपूर्ण भारतातील कॅफे आणि रस्त्यावरील गाड्यांमध्ये मिळतो. मुंबईमध्ये ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे. ही डिश सहसा समुद्रकिनारी नाश्ता म्हणून त्याचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट अॅटलासने समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. बेस्ट पारंपरिक वेगान खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात जगातील चविष्ठ खाद्यपदार्थांची यादी दिली आहे.