भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना....

Crime News: ऑस्ट्रेलियात (Australia) पाच कोरियन महिलांना (Korean Women) ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषीला ठरवण्यात आलं आहे. बालेश धनखर (Balesh Dhankar) ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या संघटनेचा प्रमुख सदस्य असून त्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.   

शिवराज यादव | Updated: Apr 25, 2023, 12:30 PM IST
भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना.... title=

Crime News: ऑस्ट्रेलियात पाच कोरिअन महिलांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याने छुप्या कॅमेऱ्यात हा सगळा निर्घृण प्रकार कैद केला होता असं वृत्त Sydney Morning Herald ने दिलं आहे.

बालेश धनखर असं या भारतीय वंशाच्या आरोपीचं नाव आहे. ऑस्ट्रेलियामधील राजकीय संबंध असणाऱ्या भारतीयांच्या संघटनेचा तो प्रमुख सदस्य आहे. त्याच्यावर एकूण 39 गुन्ह्यांप्रकरणी खटला दाखल करण्यात आला असून, यामधील 13 गुन्हे बलात्काराचे आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर 2018 दरम्यान हे बलात्कार करण्यात आले आहेत. सिडनीमधील डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याला सर्व गुन्ह्यांत दोषी ठरवलं आहे. 

हेराल्डच्या रिपोर्टनुसार, डेटा एक्स्पर्ट असणारा 43 वर्षीय बालेश धनखर याला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कोर्टातच रडू लागला. मे महिन्यात पुन्हा एकदा त्याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी होणार आहे. यावेळी त्याला शिक्षा सुनावली जाईल. 

अशी होती मोडस ऑपरेंडी

कोर्टात देण्यात आलेल्या माहितीनुसार, बालेश धनखर याची कोरियन महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी एक मोडस ऑपरेंडी ठरली होती. कोरियन भाषांतरासाठी नोकरी असल्याची खोटी जाहिरात तो द्यायचा. यानंतर ठरलेल्या हॉटेल, कॅफे आणि कोरियन रेस्तराँमध्ये तो कोरिअन महिलांना भेटायचा. तिथे तो त्यांना खोटी आश्वासनं देत सिडनी सीबीडी येथील स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये घेऊन जायचा.

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, धनखर वाईनच्या ग्लास किंवा इतर पेयात झोपेच्या गोळ्या किंवा इतर ड्रग्ज मिसळायचा. यानंतर तो त्या महिलांवर बलात्कार करत असे. हे सर्व कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यासाठी त्याने बेडशेजारील अशणाऱ्या अलार्मक क्लॉकमध्ये कॅमेरा लपवला होता. पोलिसांनी हा कॅमेरा आणि त्याचा मोबाइल जप्त केला आहे. 

पोलिसांनी ऑक्टोबर 2018 रोजी धनखरच्या अपार्टमेंटची तपासणी केली असता बलात्काराचे 47 व्हिडीओ सापडले आहेत. यामधील काही व्हिडीओंमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत दिसत असून, काहींमध्ये महिला संघर्ष करताना आणि वेदनेने ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. हे सर्व व्हिडीओ फोल्डरनुसार सेव्ह करण्यात होते आणि त्याच्यावर पीडितेचं नाव लिहिण्यात आलं होतं. 

21 ऑक्टोबर 2018 मध्ये पोलिसांनी धनखरला अटक केली, जेव्हा पाचव्या पीडितेने अत्याचार होत असताना बाथरुममध्ये जाऊन आपल्या एका मित्राला मेसेज पाठवला.
 
धनखर याने कोर्टात आपण दोषी नसल्याचा दावा केला होता. सर्व महिलांच्या संमतीने सेक्स झाल्याचा आणि व्हिडीओ शूट केल्याचा त्याचा दावा होता. यानंतर कोर्टात फार काळ हा खटला चालला. सर्व पीडितांची कसून चौकशी करण्यात आली. कोर्टात न्यायाधीशांसाठी व्हिडीओही चालवण्यात आले.
 
द हेराल्डच्या म्हणण्यानुसार, ज्युरींनी व्हिडिओ पाहिल्यावर ते "कडू" पडले आणि एका टप्प्यावर, जेव्हा ते असह्य झाले तेव्हा त्यांनी न्यायाधीशांना त्यांना लवकर घरी पाठवण्यास सांगितले.

धनखर याने आपल्या बचावात सांगितलं की, तो महिलांशी खोटे बोलला कारण विवाहबाह्य संबंध तुटल्यानंतर तो एकटा पडला होता. यामुळे आपण एकटेपणाला दोष दिला आहे.