दहशतवादी पीडितांना मदत : काबूलला गेलेल्या भारतीय तरुणीचा आत्मघाती हल्यात मृत्यू

काबूलमध्ये १४ जानेवारी रोजी एक दहशतवाद्यांकडून आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात इमारत कोसळली. यात भारतीय तरुणीचा दबून मृत्यू झाला.

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 22, 2019, 08:45 PM IST
दहशतवादी पीडितांना मदत : काबूलला गेलेल्या भारतीय तरुणीचा आत्मघाती हल्यात मृत्यू title=

काबूल : अफगाणिस्तानच्या काबूल शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात भारतीय तरुणी शिप्रा शर्मा हिचा मृत्यू झाला. शिप्रा ही दहशतवादी पीडितांना मदत करण्यासाठी काबूलला गेली होती. यावेळी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एक इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात शिप्रा सापडल्याने तिचा मृत्यू झाला. शिप्रा ही राजस्थानमधील जोधपूर येथे राहणारी. सामाजिक आवड म्हणून ती काबूलला गेली आणि दहशवादी हल्ल्यातील पिडितांसाठी मदत करत होती.

पिडितांसाठी संस्थेची केली होती स्थापना

शिप्रा हिचे पार्थिव देह दिल्लीत आणला तेथून तो जोधपूरला नेण्यात आला. या घटनेबाबात माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत शोकसंदेश व्यक्त केला आहे. काबूलमध्ये १४ जानेवारीला एक दहशतवादी हल्ल्यादरम्यान, आरडीएक्सने भरलेला ट्रक ती काम करत असलेल्या इमारतीला धडकविण्यात आला. त्यानंतर इमारत होत्याची नव्हती झाली. तेथे केवळ मातीचा ढीगाराच दिसत होता. या इमारतीत शिप्रा हिचे कार्यालय होते. ती इमारतीच्या ढिगाऱ्यात गाढली गेली. यात तिच्या मृत्यू झाला.

अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी पीडित कुटुंबांच्या पुनर्रवसनाचे काम शिप्रा करत होती. या दुर्घटनेच्या एक दिवस आधी ती जोधपूरवरुन अफगानिस्तानला गेली होती. शिप्रा अफगाणिस्तानमधील दहशतवादी पिडितांच्या विकासासाठी एक संस्था स्थापन केली होती. अफगाणिस्तान इंस्टीट्युट फॉर सिव्हील सोसायटीची संचालक म्हणून ती तीन महिने काबूलमध्ये कार्यरत होती.

 मलालाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काम

शिप्राच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती अफागाणिस्तानला जाण्यासाठी तिने सांगितले होते अफगाणिस्तानमद्ये दहशतवादी कारवाई वाढल्या आहेत. तेथे बॉम्ब स्फोट होत आहे. त्यामुळे ती तेथे न जाण्याचा विचार सल्ला घरच्यांनी दिला होता. मात्र, शिप्रा ही युसूफ मलालाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काम करत होती. एक लहान मुलगी दहशतवाद्यांशी लढा देऊ शकते तर मी का नाही? एक दिवस आपल्याला मरण येणार आहे. म्हणून मृत्यूला घाबरुन आणि स्फोटांना घाबरुन कशाला जायचे, असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते.

परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने शव भारतात पोहोचला

१४ जानेवारी रोजी शिप्रा हिच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याशी चर्चाकेली. त्यानंतर शेखावत यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना याची माहिती दिली. त्यानंतर शिप्राचा मृतदेह जोधपूरला आणण्यासाठी हालचारी सुरु झाल्यात. शुक्रवारी शिप्राचा मृतदेह आधी दिल्लीला त्यानंतर जोधपूरला आणण्यात आला.