इंडोनेशियातल्या बाली बेटावर पर्यटनासाठी जात असाल तर...

इंडोनेशियातल्या बाली बेटावर नजीकच्या काळात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. इंडोनेशियातल्या बाली बेटांवर असणाऱ्या ज्वालामुखीचा कुठल्याही क्षणी उद्रेक होण्याची भीती आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 27, 2017, 11:47 PM IST
इंडोनेशियातल्या बाली बेटावर पर्यटनासाठी जात असाल तर... title=

जकार्ता : इंडोनेशियातल्या बाली बेटावर नजीकच्या काळात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. इंडोनेशियातल्या बाली बेटांवर असणाऱ्या ज्वालामुखीचा कुठल्याही क्षणी उद्रेक होण्याची भीती आहे. 

माऊंट अगाँग या ज्वालामुखीने धोक्याची सर्वोच्च म्हणजे 4 क्रमांकाची पातळी गाठलीय. त्यामुळे बालीचा देनपसार एअरपोर्ट 24 तासांसाठी बंद करण्यात आलाय. तब्बल 445 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तब्बल 59 हजार प्रवासी बालीत अडकलेत. 

ज्वालामुखीच्या राखेचा प्रादुर्भाव बालीत आढळतोय. धुमसणाऱ्या माऊंट अगाँग ज्वालामुखीतून ज्वालामुखीच्या राखे बाहेर येत आहे. तसंच लाव्ही प्रवाही झाला., ज्वालामुखीच्या 100 किमी परिसरात याचा धोका आहे. 

या परिसरातल्या 22 खेड्यांमधल्या किमान 90 हजार ते 1 लाख लोकसंख्येला याचा धोका संभवतो. त्यातल्या किमान 40 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय असं प्रवक्त्याने सांगितलंय. बाली या निसर्गरम्य बेटांवर भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी जातात.