गुप्तांगाला हात लावत म्हणाला, 'आम्ही Threesome पण..'; इटालियन PM च्या जोडीदाराचा धक्कादायक Video

Italian PM Giorgia Meloni Sexual Video: काही आठवड्यांपूर्वीच जी-20 निमित्त भारतात आलेल्या या महिला पंतप्रधानांबरोबर राहणाऱ्या त्यांच्या लिव्ह इन पार्टनरचा धक्कादायक व्हिडीओ आणि ऑडिओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 22, 2023, 12:25 PM IST
गुप्तांगाला हात लावत म्हणाला, 'आम्ही Threesome पण..'; इटालियन PM च्या जोडीदाराचा धक्कादायक Video
हा व्हिडीओ इटलीमधील एका वृत्तसंस्थेनं सार्वजनिक केला आहे

Italian PM Giorgia Meloni Sexual Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) या त्यांच्या जोडीदारापासून 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाल्या आहेत. जॉर्जिया मेलोनी आणि त्यांचा पार्टनर एंड्रिया गियाब्रूनो (Andrea Giambruno) विभक्त झाल्याची बातमी 2 दिवसांपूर्वीच समोर आली आहे. मात्र आता एंड्रिया गियाब्रूनो यांनी आपल्या सहकारी महिलांना ग्रुप सेक्ससाठी प्रस्ताव दिल्याने हे दोघे विभक्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मिडियासेट' या इटलीमधील वृत्त संस्थेनं यासंदर्भातील ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप सार्वजनिक केल्या आहेत. या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतरच जॉर्जिया मेलोनी यांनी एंड्रिया गियाब्रूनोपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

थ्रीसम आणि फोरसमचा उल्लेख

आपलं एक विवाहबाह्य प्रकरण सुरु असून आम्ही 3 किंवा 4 पार्टनर मिळून एकत्रितपणे शरीरसंबंध ठेवतो. यामध्ये तुलाही सहभागी व्हायला आवडेल का असं एका महिलेला एंड्रिया गियाब्रूनोने विचारलं होतं. 'मिडियासेट'ने जी ऑडिओ क्लिप जारी केले आहे त्यामध्ये एंड्रिया गियाब्रूनो एका महिलेला, "माझं आणि तिचं (महिलेच्या नावाचा थेट उल्लेख नाही) अफेअर सुरु आहे, हे तुला ठाऊक आहे का? सर्व प्रसारमाध्यमांना याबद्दल माहिती आहे. आता तुलाही हे कळलं आहे. आम्ही एका तिसऱ्या जोडीदाराच्या शोधात आहोत. आम्ही थ्रीसमही करतो... अनेकदा तर फोरसमही करतो. तुला आमच्या या ग्रुपमध्ये सहभागी व्हायला आवडेल का?" असं विचारताना ऐकू येत आहे. 

गुप्तांगाजवळ हात नेतो आणि...

'मिडियासेट'ने जी व्हिडीओ क्लिप जारी केली आहे त्यापैकी एकामध्ये एंड्रिया गियाब्रूनो एका महिला सहकाऱ्याशी सर्वांसमोर अंगलट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एंड्रिया गियाब्रूनो या व्हिडीओमध्ये महिलेला वारंवार स्पर्श करताना दिसतो. या महिलेशी बोलताना एंड्रिया गियाब्रूनो आपल्या गुप्तांगाजवळ हात नेतो आणि त्या महिलेकडे पाहून, "मी तुला आधी का नाही भेटलो?" असं म्हणता दिसतो. एंड्रिया गियाब्रूनो पूर्वी पत्रकार होता. 

पहिली भेट टीव्ही शोमध्ये मग 'लिव्ह इन'मध्ये राहू लागले

शुक्रवारीच एंड्रिया गियाब्रूनोची जोडीदार आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी विभक्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली होती. हे दोघेही जवळपास एक दशक एकत्र होते. या दोघांची पहिली भेट 2015 मध्ये एका टीव्ही शो दरम्यान झाली होती. नंतर दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यामधूनच प्रेम फुलत गेलं. दोघेही लिव्ह इनमध्ये एकत्र राहू लागले. दोघांना 6 वर्षांची मुलगीही आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More