Trending News : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या 21 वर्षीय मुलीची सर्वत्र चर्चा आहे. कारण तिचा लग्नाची घोषणा करण्यात आलीय. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. यामागे कारणही तसंच आहे. कारण ती ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे. त्या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. आफ्रिकेतील एकमेव उरलेल्या राजघराण्यातील (प्रजासत्ताक) इस्वाटिनीच्या 56 वर्षीय राजाची ती 16वी पत्नी होणार आहे. या राजाला आधीच 25 मुलं आहेत. 21 वर्षीय नोमसेबा जुमाने गेल्या सोमवारी इस्वाटिनी शहरातील लोबांबा इथे पारंपारिक समारंभात सहभागी झाली होती. त्याला 'लाइफवेला' म्हणतात. यामध्ये मुली पारंपरिक पेहरावात नाचतात.
नॅशनल जिओग्राफीच्या रिपोर्टनुसार, या देशात दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लुडझिजिनी नावाच्या गावात उमलंगा सेरेमनी नावाचा उत्सव भरत असतो. या उत्सवात देशातील 10 हजारांहून अधिक अविवाहित मुली सहभागी होत असतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणींनी राजासमोर टॉपलेस नृत्य करत परेड करतात. या तरुणींपैकी एक तरुणीची तो राजा राणी म्हणून निवड करतो.
लाइफोवेला नृत्यात सहभागी होणाऱ्या मुली स्त्रीत्वात प्रवेश करतात अशी इथली मान्यता आहे. दिवसभर चालणारा रीड डान्स हा स्त्रीत्वाचा एक पारंपारिक संस्कार आहे, ज्यात तरुण एक विशिष्ट प्रकारचा पोषाख परिधान करतात. ज्यात त्यांचा छातीचा भाग उघडा असतो. रंगीबेरंगी कपडे घालून त्या गातात आणि नृत्य करतात. पारंपारिक कपड्यांमध्ये पायल आणि जाड रंगीबेरंगी टॅसेल्स असतात. काही उपहासात्मक तलवारी आणि ढालीदेखील घेऊन नाचतात. या समारंभात नोमसेबा जुमाने इस्वाटिनीच्या राजासाठी नृत्य केलं. या सोहळ्याला पाच हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
हा सोहळा दिवसभर सुरू असतो. हा स्त्रीत्वाचा पारंपारिक संस्कार आहे. या प्रसंगी, 56 वर्षीय राजा मस्वती आपल्या नवीन पत्नीबद्दल सार्वजनिक घोषणा करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, राजा मस्वती II यांना सध्या 11 बायका आहेत. त्याने एकूण 15 वेळा लग्न केलं होतं. तर त्याला 25 मुलं आहेत. मस्वतीच्या भावाने गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, नोमसेबा झुमा रीड डान्समध्ये 'लिफोवेला' म्हणजेच शाही मंगेतर किंवा उपपत्नी म्हणून भाग घेईल.
शिवाय हे लग्न राजकीय फायद्यासाठी नसून प्रेमविवाह आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, 'प्रेमाला वय पाहण्यासाठी किंवा मोजण्यासाठी डोळे नसतात. प्रेम दोन व्यक्तींमध्ये होतं. 100 वर्षांची व्यक्ती आणि घटनात्मकरित्या स्वीकारलेल्या सरासरीपेक्षा जास्त व्यक्ती यांच्यात हे घडू शकतं.' त्याच वेळी, राजा मस्वती आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष झुमा हे आधीच लग्नाद्वारे नातेवाईक आहेत.
त्याचवेळी नोमसेबाचे वडील 82 वर्षीय जेकब झुमा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. पण, भ्रष्टाचारप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेही परंपरेनुसार बहुपत्नी आहे आणि त्यांनाही किमान 20 मुलं आहेत. 1999 च्या शस्त्रास्त्र व्यवहाराबाबत सध्या त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे.
त्याच वेळी, इस्वातिनी हा खूप छोटा देश आहे. पूर्वी ते स्वाझीलँड म्हणून ओळखलं जात असं. इथल्या लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं तर 1 कोटी 10 लाख एवढीच आहे. जगातील सर्वाधिक एचआयव्ही/एड्स संसर्गाची प्रकरणे इथे आढळून येतात.
स्वाजिलँडचा राजा 2015 मध्ये भारतातही आला होता. तेव्हा तो आपल्यासोबत 15 बायका, मुलं आणि 100 नोकऱ्यांची फौजफाटा घेऊन आला होता. तो भारत आफ्रिका समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली आला होता. त्यावेळी त्याने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.