इंग्लंडमध्ये मोठा राजकीय भूकंप; Liz Truss यांचा राजीनामा, ऋषी सुनक होणार नवे पंतप्रधान?

45 दिवसांच्या कारभारानंतर ट्रस यांचा राजीनामा

Updated: Oct 20, 2022, 06:40 PM IST
 इंग्लंडमध्ये मोठा राजकीय भूकंप; Liz Truss यांचा राजीनामा, ऋषी सुनक होणार नवे पंतप्रधान? title=

ब्रिटनच्या पंतप्रधान (British Prime Minister) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यात, सरकारने एक आर्थिक योजना सादर केली, ज्याच्या अपयशामुळे आर्थिक गोंधळ आणि राजकीय संकट निर्माण झाले होते. यानंतर आता ट्रस यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

ट्रस (Liz Truss) यांनी डाउनिंग स्ट्रीटच्या एका निवेदनात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.  गेल्या महिन्यात, सरकारने एक आर्थिक योजना सादर केली, जी आर्थिक गोंधळ आणि राजकीय संकट निर्माण करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर ट्रस यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता ट्रस यांनी राजीनामा दिला आहे.

अर्थमंत्री बदलण्याव्यतिरिक्त, ट्रस यांना त्यांच्या अनेक धोरणांमध्ये बदल करावा लागला होता. ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, असे अनेक कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते सांगत होते. प्रदीर्घ दबावानंतर ट्रस पायउतार झाल्या आहेत. 

दरम्यान, यानंतर आता ब्रिटनमधील भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यासाठी राजकीय समीकरणांनी पुन्हा एकदा नवी आशा निर्माण केली आहे. कदाचित ते लवकरच ब्रिटनचे नवे पंतप्रधान होतील. सध्याच्या परिस्थितीत या पदासाठी ऋषी सुनक हे सर्वात लोकप्रिय दावेदार आहेत.